प्रजासत्ताक दिनी करायचा होता घातपात !

होशियारपूर (पंजाब) : प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा खलिस्तानी आतंकवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. येथे पोलिसांनी पाकपुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’शी संबंधित गटातील ४ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून अनुमाने अडीच किलो आर्.डी.एक्स. या स्फोटकांनी भरलेले बाँब जप्त करण्यात आले आहेत.
१. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची दिलजोत सिंह, हरमन सिंह उपाख्य हॅरी, अजय उपाख्य माहिरा आणि अर्शदीप सिंह उपाख्य अर्श कंडोला अशी नावे आहेत. हे सर्व जण एस्.बी.एस्. नगर जिल्ह्यातील राहों भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून स्फोटकांव्यतिरिक्त दोन पिस्तूलेही जप्त केली आहेत.
𝐈𝐧 𝐚 𝐦𝐚𝐣𝐨𝐫 𝐛𝐫𝐞𝐚𝐤𝐭𝐡𝐫𝐨𝐮𝐠𝐡 𝐚𝐠𝐚𝐢𝐧𝐬𝐭 #𝐏𝐚𝐤𝐢𝐬𝐭𝐚𝐧’𝐬 #𝐈𝐒𝐈-𝐛𝐚𝐜𝐤𝐞𝐝 𝐭𝐞𝐫𝐫𝐨𝐫 𝐧𝐞𝐭𝐰𝐨𝐫𝐤, 𝐇𝐨𝐬𝐡𝐢𝐚𝐫𝐩𝐮𝐫 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐢𝐧 𝐚 𝐣𝐨𝐢𝐧𝐭 𝐨𝐩𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐰𝐢𝐭𝐡 𝐂𝐨𝐮𝐧𝐭𝐞𝐫 𝐈𝐧𝐭𝐞𝐥𝐥𝐢𝐠𝐞𝐧𝐜𝐞, 𝐉𝐚𝐥𝐚𝐧𝐝𝐡𝐚𝐫… pic.twitter.com/A3c444Z7uf
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) January 23, 2026
२. या गटाला अमेरिकेत बसलेल्या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या हस्तकांद्वारे चालवले जात होते. प्राथमिक चौकशीत उघड झाले की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना लक्ष करून मोठे आतंकवादी आक्रमण करण्यासाठी या बाँबचा वापर केला जाणार होता.अमेरिकेतील हस्तक तेथून या आतंकवाद्यांना सूचना देत होते, तर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) त्यांना स्फोटके पुरवत होती. पंजाबमधील शांतता भंग करणे आणि हत्या करणे, यांसाठी ही टोळी सिद्ध करण्यात आली होती. पोलीस सध्या या चारही आतंकवाद्यांची कसून चौकशी करत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले