‘९.१.२०२६ या दिवशी श्रीमती प्रभावती शिंदे यांचे निधन झाले. श्रीमती प्रभावती शिंदे या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री असून त्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहात होत्या. त्यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सुश्री वैशाली बांदिवडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. इतरांचा विचार करणे

‘आम्ही शिंदेआजींची सेवा करत असतांना त्या आमच्याशी बोलत असत. आम्ही त्यांचे अंग पाण्याने पुसत असतांना (त्यांना स्पंजिंग करत असतांना) त्या स्वतःहून हात पुढे करत असत. ‘त्या इतरांना काही अडचण येऊ नये’, अशाप्रकारे वागत असत. त्या इतरांचा पुष्कळ विचार करत असत. त्यांचे शरीर पुष्कळ कडक झाले होते. त्यांना स्पंजिंग करत असतांना हलवावे लागत असे. त्या वेळी मी आणि सौ. मीनल शिंदे (शिंदेआजींची सून) आजींना एका कुशीवरून दुसर्या कुशीवर करून त्यांचे अंग पाण्याने पुसत असू. त्या वेळी आजींना वेदना होत असत; मात्र त्या काहीही सांगत नसत. आम्ही जसे करू, तसे त्या करू देत असत.
२. सहनशील
आजींना मूळव्याधीचा त्रास होता. त्यांचे दात दुखायचे, तरीही आजींची कधी चिडचिड झाली नाही.
३. प्रेमभाव
मी आजींची सेवा करण्यासाठी गेल्यावर त्या त्यांच्यासाठी जो काही खाऊ ठेवलेला असायचा, त्यातील मला देत असत. त्यांना इतरांना खाऊ द्यायला पुष्कळ आवडत असे. आजी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना त्यांची (आजींची) सेवा करणार्या साधकांना काही ना काही वस्तू द्यायला सांगत असत. सद्गुरु राजनदादा आईची (आजींची) इच्छा पूर्ण करत असत. आजींमध्ये पुष्कळ प्रेमभाव होता.
४. निरागस
आजी बोलत असतांना ‘लहान मूलच बोलत आहे’, असे वाटून आम्हाला त्यांचे कौतुक वाटायचे. त्यांचे वागणे, बोलणे लहान मुलांसारखे वाटत होते. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटायचे.
५. अनुभूती
शिंदेआजींची सेवा केल्यावर हलकेपणा जाणवणे आणि आनंद मिळणे : मला आजींची सेवा करायला आवडत असे. आजींची सेवा केल्यानंतर मला हलकेपणा जाणवायचा आणि आनंद मिळायचा. मी आजींची सेवा मागून घेतली होती. आजींची सेवा केल्यावर मला कृतज्ञता वाटत असे. ‘त्यांच्याकडून मला चैतन्य मिळते आणि माझे प्रारब्धही न्यून होते’, असे मला वाटत असे.
‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला आजींची सेवा करता आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. वर्ष २०१८ पासून शिंदेआजी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्या. त्यांना पहिल्यांदा भेटल्यावर मला माझ्या आईची आठवण आली. मला त्यांच्या प्रती पुष्कळ आपलेपणा आणि प्रेम वाटले. त्यांनीही मला त्यांची लेक मानले.
२. त्या पुष्कळ दिवस रुग्णाईत होत्या; पण त्यांना कधी वेदनांमुळे विव्हळतांना पाहिले नाही. त्यांच्या सूनबाई सौ. मीनलताई (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या पत्नी) त्यांची सेवा मनोभावे करायच्या. कधी कधी शिंदेआजी त्यांना ओळखायच्या नाहीत आणि सांगायच्या, ‘‘ताई माझी पुष्कळ चांगली सेवा करते. तिला काहीतरी खाऊ दे.’’ त्या वेळी त्या ओळख विसरायच्या.
३. शिंदेआजींचे त्यांच्या सर्व मुलांवर पुष्कळ प्रेम होते. त्यांना त्यांच्या मुलांचा पुष्कळ अभिमान वाटत असे. त्यांना सद्गुरु राजनदादांचे पुष्कळ कौतुक वाटायचे.
४. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी मी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले. त्या वेळी त्यांची दृष्टी स्थिर होती. त्या माझ्याकडे पुष्कळ वेळ पहात होत्या.
५. शिंदेआजींचे निधन झाल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. शिंदेआजींचे अंत्यदर्शन घेत असतांना मला त्यांचा चेहरा शांत आणि स्थिर वाटत होता.
आ. मला वातावरणात पुष्कळ शांतता जाणवत होती.’
(१३.१.२०२६)
| • इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. संपादक |
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !