‘फेब्रुवारी २०१८ पासून माझी आई श्रीमती प्रभावती शिंदे (वय ९० वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होती. ९.१.२०२६ या दिवशी आईचे देहावसान झाले. आईच्या आश्रमातील वास्तव्याच्या काळात आश्रमातील साधक, तसेच नातेवाईक या सर्वांनी पुढीलप्रमाणे साहाय्य केले.

१. आश्रमातील उत्तरदायी साधक आणि अन्य साधक यांनी आत्मीयतेने केलेली आईची सेवा
१ अ. आश्रमातील उत्तरदायी साधकांनी अनेक सेवांचे उत्तम प्रकारे नियोजन करणे : वर्ष २०२० मध्ये आई डोक्यावर पडली होती आणि तेव्हा तिचे डोक्याचे शस्त्रकर्म झाले होते. त्यानंतर वर्ष २०२३ आणि २०२५ मध्ये आईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते. आईसारखा वयोवृद्ध रुग्ण जेव्हा रुग्णालयात भरती होतो, तेव्हा २४ घंटे तेथे कुणीतरी उपस्थित रहाणे आवश्यक असते. रुग्णाची सेवा करण्याव्यतिरिक्त ‘तेथे सेवेसाठी असणार्या साधकांना प्रसाद आणि महाप्रसाद नेऊन देणे, रुग्णासाठी पथ्याचे पदार्थ बनवणे, साधकांची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे’, इत्यादी अतिरिक्त सेवाही आश्रमातील साधकांना कराव्या लागतात. या सर्व सेवांचे नियोजन आश्रमातील उत्तरदायी साधकांनी अतिशय उत्तम प्रकारे करायचे, तसेच आवश्यकतेप्रमाणे सेवेसाठी साधिकांचे नियोजन करून त्यांना रुग्णालयात पाठवायचे.

सनातनच्या बर्याच साधकांना त्यांच्या नातेवाइकांचा विरोध सहन करून साधना करावी लागते. बरेच जण सनातनचे कार्य समजून न घेता अकारणच विरोध करत असतात. या पार्श्वभूमीवर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या नातेवाइकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या आजारपणात त्यांनी स्वतःचे दायित्व न टाळता स्वतःहून सर्व स्तरांवर साहाय्य केले आणि अन्य साधकांच्या नातेवाइकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. सनातनच्या देवद (पनवेल) आश्रमातील सर्व साधकांनीही श्रीमती शिंदेआजींची रुग्णसेवा आपलेपणाने आणि तत्परतेने केली. यातून ‘आश्रमातील सर्व साधकांमध्ये एक निरपेक्ष कुटुंबभाव रुजला आहे’, हे लक्षात येते. अशा प्रकारे कुटुंबभाव रुजवणारे आश्रमातील उत्तरदायी साधक आणि अन्य साधक हे सर्व जण कौतुकास पात्र आहेत !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.१.२०२६)
१ आ. साधिकांनी अनेक वर्षे आईची सेवा आत्मीयतेने करणे : आश्रमातील साधकांनी रुग्णालयात आणि आश्रमात असतांना आईची सेवा पुष्कळ आत्मीयतेने अन् मनापासून केली. कोणताही कंटाळा न करता काही साधिकांनी अनेक वर्षे आईची सेवा केली. सेवेला असणारी साधिका आणि आई यांच्यात प्रेमाचे एक नाते निर्माण व्हायचे.
१ इ. साधकांनी आईसाठी नामजपादी उपाय करणे : जेव्हा जेव्हा आईला आध्यात्मिक त्रास व्हायचा, त्या त्या वेळी आवश्यकतेनुसार आश्रमातील साधक तिच्यासाठी नामजपादी उपाय करायचे.
१ ई. आश्रमातील वैद्यांकडून तत्परतेने उपचार मिळणे : आवश्यक त्या वेळेला आईला आश्रमातील आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी, तसेच वैद्या (सुश्री) माया पाटील यांचे पुष्कळ सहकार्य, मार्गदर्शन आणि उपचार मिळत होते.
१ उ. साधकांकडून सर्व प्रकारचे साहाय्य मिळणे : जानेवारी २०२४ पासून माझी पत्नी सौ. मीनल शिंदे आईची सेवा करण्यासाठी गोव्यातून देवद येथील आश्रमात येऊन राहिली होती. तिला जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचे साहाय्य लागायचे, तेव्हा आश्रमातून ते दिले जायचे.
२. नातेवाइकांनी वेळोवेळी आणि तत्परतेने केलेले साहाय्य

२ अ. आईच्या आजारपणात नातेवाइकांनी आर्थिक साहाय्य करण्यासह रुग्णालयातही सेवेस येणे : आईच्या आजारपणात वेळोवेळी नातेवाइकांनी आर्थिक साहाय्य करण्यासह ‘प्रत्यक्ष सेवेसाठी रुग्णालयात उपस्थित रहाणे किंवा आश्रमात आवश्यकतेप्रमाणे येऊन सेवा करणे’, असे साहाय्य केले. यांसारख्या सेवा छोटा भाऊ विलास, मोठी वहिनी प्रीती, मोठी बहीण श्रीमती विभावरी हनुमंते, तसेच लहान बहीण सौ. रंजना काळण यांनी वेळोवेळी केल्या.
२ आ. परिवाराने प्रसंगी आश्रमात येऊनही सेवा करणे : जेव्हा काही कारणामुळे आम्हाला बाहेरगावी जावे लागायचे, तेव्हा वरील नातेवाईक आपापसांत नियोजन करून अधिकाधिक वेळ देऊन आईच्या सेवेसाठी आश्रमात यायचे. माझा लहान भाऊ विलास केव्हाही आणि कोणतेही साहाय्य मागितले की, लगेच धावत यायचा.
असे साहाय्य करणारे सर्व साधक आणि नातेवाईक यांच्याप्रती कितीही आभार व्यक्त केले, तरी ते अल्पच आहेत.
कृतज्ञता
साहाय्य करणारे असे प्रेमळ नातेवाईक आम्हाला लाभले, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! निःस्वार्थीपणे सेवा करणारे असे साधक तयार करणार्या तिन्ही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणी कोटीशः प्रणाम आणि कृतज्ञता !
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी लिहून घेतलेले हे लिखाण त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण !
इदं न मम ।’
(समाप्त)
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१.२०२६)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !