Lashkar E Taiba Terrorist : लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

कोलकाता (बंगाल) – राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष न्यायालयाने पाकमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ७० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. सैयद एम्. इद्रीस असे त्याचे नाव असून तो कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो बंगालमध्ये मुसलमान तरुणांना लष्कर-ए-तोयबात भरती करून घेत होता. त्याच्या अन्य २ सहकार्‍यांवर खटला चालू आहे.

संपादकीय भूमिका

कारागृहातून सुटल्यानंतर तो पुन्हा आतंकवादी कारवाया करणार, यात शंका नसल्याने अशा आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !