आज ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सुश्री) विजयालक्ष्मी चव्हाण यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१३.१.२०२६ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्या सुश्री विजयालक्ष्मी चव्हाणआत्या (वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. आत्या रुग्णाईत असतांना साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रेमभाव : ‘आत्या बर्याच मासांपासून पुष्कळ रुग्णाईत होत्या. त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता. त्यामुळे त्या कुणाला ओळखत नसत; परंतु त्यांच्यासाठी प्रसाद-महाप्रसाद घेऊन येणार्या साधिकेला त्या विचारत, ‘‘तू खाल्लेस का ? तूही माझ्या समवेत खा.’’
१ आ. ऐकण्याची वृत्ती : आत्या त्यांची सेवा करणार्या साधिकांचे ऐकत असत. आत्यांच्या निधनाच्या आधी एक आठवडा मी त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांना महाप्रसाद भरवणारी साधिका जेवण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन आली होती. आत्यांना ते नको होते. त्यांनी मान हलवून ‘नको’, असे तिला सांगितले. सेवा करणार्या साधिकेने त्यांना ‘१ – २ चमचे तरी घ्या’, असे सांगितल्यावर त्यांनी थोडेसे जेवण घेतले. ती साधिका ‘अजून थोडे घ्या’, असे सांगत होती आणि आत्या तिचे ऐकून थोडे जेवण ग्रहण करत होत्या. असे करत करत आत्यांनी सर्व जेवण ग्रहण केले. त्या वेळी मला आत्यांचे आणि त्यांना महाप्रसाद भरवणार्या साधिकेचेही कौतुक वाटले.

१ इ. भाव
१ इ १. साधकांप्रतीचा कृतज्ञताभाव : आत्यांची सेवा करण्यासाठी साधिका त्यांच्याकडे येत असत. त्यांची सेवा पूर्ण झाल्यावर आत्या कृतज्ञताभावाने हात जोडून त्यांना नमस्कार करायच्या. त्या वेळी त्यांच्या चेहर्यावर कृतज्ञताभाव जाणवायचा.
१ इ २. संतांप्रतीचा भाव
१ इ २ अ. स्मृतीभ्रंश झालेला असूनही प.पू. भक्तराज महाराजांना ओळखून त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करणे : आत्यांना काही कळत नव्हते; परंतु त्या चालू-फिरू शकत होत्या. त्यांच्या निवासाच्या लगत असलेल्या प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्राकडे जाऊन त्या भावपूर्ण नमस्कार करत असत. त्यांना ‘ते कोण आहेत ?’, असे विचारल्यावर ‘ते प.पू. भक्तराज महाराज आहेत’, असे त्या सांगत असत. आत्या तिथून जवळच असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनाकडे जाऊन बसत आणि मोठ्या आवाजात ‘हरि ॐ तत्सत्’, असा जप करत असत. त्यांना ‘तुम्हाला निवासस्थानी सोडू का ?’, असे विचारल्यावर त्या प्रेमाने सांगत असत, ‘‘मला बाबांकडे अजून थोडा वेळ बसू दे.’’
१ इ २ आ. आत्यांनी त्यांच्या पलंगावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ ठेवला होता. आत्या त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहात असत.
‘गुरुमाऊलींच्या कृपेनेच आत्या रुग्णाईत असतांनाचे त्यांचे गुण माझ्या लक्षात आले आणि मला ते लिहून देता आले’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. आत्यांकडे पाहिल्यावर ‘त्या शांतपणे झोपल्या आहेत आणि कधीही उठून बसतील’, असे वाटत होते.
आ. त्यांचा चेहरा पिवळसर आणि तेजस्वी दिसत होता. ‘त्या इतके दिवस रुग्णाईत होत्या’, असे वाटत नव्हते.’
– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१.२०२६)
कै. (सुश्री) विजयालक्ष्मी चव्हाण यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे !
(सुश्री) विजयालक्ष्मी चव्हाण (आत्या) रुग्णाईत असतांना त्यांची सेवा करणार्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सौ. स्मिता नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
‘सुश्री विजयालक्ष्मी चव्हाणआत्या शेवटचे २ मास अंथरुणावरच होत्या. त्यांची सर्व सेवा मी आणि एक साधिका करत असू.
१ अ. गुणवैशिष्ट्ये
१ अ १. आत्या सर्व साधकांशी प्रेमाने वागायच्या.
१ अ २. त्या एवढ्या आजारी असूनही त्यांनी कधीही ‘मला एखादा पदार्थ बनवून द्या’, असे सांगितले नाही.
१ अ ३. शेवटच्या दिवसांत त्या लहान मुलांसारख्या निरागस वाटत होत्या. त्यांची सेवा करतांना आम्हाला कधीही कंटाळा येत नसे.
१ अ ४. सतत देवाच्या अनुसंधानात असणे
अ. त्यांचा नामजप अखंड चालू असायचा.
आ. शेवटच्या १ मासात त्या डोळे बंद करूनच सगळ्या कृती करायच्या. एकदा त्यांनी स्वतःचे कान धरून मोठ्याने क्षमायाचना केली, ‘हे दुर्गामाते, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. हे माते, मला क्षमा कर.’ तेव्हा त्यांच्या शब्दांत खंत जाणवत होती.
इ. एकदा आम्ही त्यांना विचारले ‘‘आत्या डोळे बंद का करता ? तुम्ही काय विचार करत आहात ? डोळे उघडा ना !’’ तेव्हा त्यांनी लगेच हळूच डोळे उघडले आणि डोळे किलकिले करून मोठ्याने दत्ताचा जप चालू केला.
१ अ ५. त्यांची प.पू. गुरुमाऊलींवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) पुष्कळ श्रद्धा होती.
१ आ. निधन झाल्यानंतर जाणवलेली सूत्रे
१. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांचे शरीर जड वाटत होते. त्यांना उचलण्यासाठी २ -३ साधक लागायचे; परंतु त्यांच्या निधनानंतर ७ – ८ घंटे होऊनही त्यांचे शरीर जड आणि कडक झाले नव्हते. ते हलके आणि मऊ वाटत होते.
२. निधनानंतर त्यांचे अंग पाण्याने पुसतांना आणि त्यांना वस्त्र परिधान करतांना ‘एखाद्या बाळाला कपडे घालत आहोत’, असे मला वाटत होते.
३. त्यांच्या चेहर्यावर सुरकुत्या दिसत नव्हत्या. त्यांचा चेहरा तुकतुकीत आणि तेजस्वी दिसत होता.
४. वातावरणात कुठल्याही प्रकारचा दाब जाणवत नव्हता.
परम पूज्य गुरुमाऊलींनी आम्हा सर्वांकडून त्यांची सेवा करून घेतल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. श्री. नितीन चुरी (वय ६४ वर्षे), देवद, पनवेल.
२ अ. ‘आत्यांचा आवाज अतिशय खणखणीत होता.
२ आ. उतारवयातही त्या चष्म्याचा वापर न करता दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायच्या.
२ इ. स्मृतीभ्रंश झालेला असूनही सेवा करणार्या साधकाचे कृतीतून कौतुक करणे : शेवटचे २ मास त्या अंथरुणाला खिळून होत्या. जेव्हा त्यांना जागेवरून सरकवायचे असेल किंवा बसवायचे असेल, तेव्हा सुश्री नीलिमा कुलकर्णीताई मला साहाय्याला बोलवत असे. एकदा मी त्यांना ‘नमस्कार’ म्हटल्यावर त्यांनीही नमस्कार करून डाव्या हाताने माझ्या हनुवटीवरून प्रेमाने हात फिरवला. खरेतर त्यांचा स्मृतीभ्रंश झालेला असल्याने त्यांना काही कळत नव्हते; पण ‘मी त्यांची सेवा करत आहे’, हे त्यांना कळत असावे; म्हणून त्यांनी माझे कौतुक केले’, असे मला जाणवले.’
३. श्री. नितीन चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘सुश्री चव्हाणआत्या यांचे अंत्यदर्शन घेत असतांना मला चैतन्य जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.१.२०२६)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना संतांना धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !