Close
वैशाख कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

फलक प्रसिद्धी

मशिदींवरील अवैध भोंगे न हटवणार्‍या प्रशासनाची मोगलाई !

गोवंडी, देवनार बस आगाराजवळील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नुकतेच भुईसपाट करण्यात आले. या मंदिराची सर्व कागदपत्रे मंदिराच्या विश्‍वस्तांकडे उपलब्ध आहेत.

पाकचे नावही न घेऊ शकणारे त्याला कधीतरी धडा शिकवतील का ?

आपल्या शेजारी मित्राने (पाकिस्तान) सुधारायला हवे. आम्हाला आजही विश्‍वास आहे की, तो सुधारेल आणि नाही सुधारला, तर त्याला सुधारावेच लागेल, असा दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्कीममधील एका कार्यक्रमात दिला.

इस्लामी देश त्यांच्या धर्मातील नागरिकांचे रक्षण करतात, हे लक्षात घ्या !

ढाका बॉम्बस्फोटातील आतंकवाद्यांना प्रेरणा देणारे डॉ. झाकीर नाईक यांना सौदी अरेबियाने नागरिकत्व दिले आहे. अटकेपासून वाचण्यासाठी डॉ. झाकीर भारतातून सौदी अरेबियात पळाले होते.

जाधव यांच्या सुटकेसाठी आता थेट सैनिकी कारवाई आवश्यक !

पाकच्या कारागृहात बंद असलेले कुलभूषण जाधव यांना पाकने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली; मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नाही, असे पाकने सांगितले आहे.

आतंकवादग्रस्त भारत या समस्येतून कधी मुक्त होणार ?

भाग्यनगर येथील पोलिसांनी इसिसच्या ३ आतंकवाद्यांना कह्यात घेतले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने भाग्यनगरमध्ये एक स्टिंग ऑपरेशन केले होते. यात इसिसचे भारतातील जाळे कसे सिद्ध होत आहे, याविषयीची माहिती समोर आली होती.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटी कोटी वंदन !

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या उत्कर्षासाठी हिंदु राष्ट्र हवे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाप्रीत्यर्थ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सदैव प्रयत्नशील रहाणे, हीच त्यांच्या चरणी खर्‍या अर्थाने कृतज्ञता ठरेल.

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसचा हिंदूंच्या श्रद्धांवर आघात !

भगवान श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला, अशी हिंदूंची आस्था आहे. रामावरील हिंदूंच्या आस्थेवर शंका घेता येत नाही

केवळ नागरिकांचे स्थलांतर करण्यापेक्षा पाकला सडेतोड उत्तर द्या !

‘पाककडून सातत्याने होणार्‍या गोळीबारामुळे काश्मीरमधील सीमेजवळ रहाणार्‍या लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जीवित हानी रोखण्यासाठी आतापर्यंत प्रशासनाने १ सहस्राहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे.

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करणे, ही निधर्मीवाद्यांची जुनीच खोड !

आम आदमी पक्षाचे नेते आशीष खेतान यांनी दावा केला आहे की, त्यांना हिंदुत्वनिष्ठांकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणारे पत्र त्यांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आता भारताने पाकला समजेल अशाच भाषेत उत्तर द्यावे !

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश दिला होता; मात्र हा आदेश मान्य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.