पुणे येथील चतुःशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार चालू असतांनाही भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले !

यावर्षी नवरात्रोत्‍सवासाठी देवीला चांदीची नवी आयुधे करण्‍यात आली आहेत. १५ ऑक्‍टोबरला सकाळी घटस्‍थापना झाल्‍यावर ही आयुधे देवीला परिधान करण्‍यात येणार आहेत.

तीर्थक्षेत्रांच्‍या विकासाचा पेच !

तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्‍या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्‍टी विचारात घेणे आवश्‍यक !

सियालकोट (पाकिस्तान) येथे ७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडले !

७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडण्यात आले. ‘शिवाला तेजा सिंह’ असे या मंदिराचे नाव आहे.

तीर्थक्षेत्रांच्‍या सुधारित विकास आराखड्यास राज्‍यशासनाची मान्‍यता !

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्‍योतिर्लिंग, घृष्‍णेश्‍वर आणि सप्‍तश्रृंगीदेवी या तीर्थक्षेत्रांच्‍या सुधारित विकास आराखड्याला राज्‍यशासनाने मान्‍यता दिली आहे. यासाठी ५३१ कोटी रुपयांचे प्रावधान शासनाकडून करण्‍यात आले आहे.

पाथर्डी (अहिल्यानगर) येथील श्री मोहटादेवीचे गाभार्‍यातून ‘व्हीआयपी’ दर्शन घेण्यास बंदी !

शारदीय नवरात्रोत्सव कालावधीमध्ये ‘मोहटादेवी देवस्थान ट्रस्ट’ने मंदिर गाभार्‍याच्या आतमधून देवीचे ‘व्हीआयपी’ (महनीय व्यक्तींसाठी) दर्शन बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयास प्रशासनाचे सहकार्य लाभले.

नाशिक येथील श्री कालिकामातेचे नवरात्रोत्सवात २४ घंटे दर्शन !

मंदिरात पैसे घेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणे, याला मंदिरांचे सरकारीकरणच कारणीभूत आहे. ते थांबवण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करून भाविकांकडेच सोपवली पाहिजेत !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात, तसेच संबळाच्या निनादात ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी मंचकी निद्रेचा विधी पार पडला. प्रारंभी पंचामृत अभिषेक, विधीवत् पूजन आणि आरतीनंतर श्री तुळजाभवानीदेवीला शयनगृहात नेण्यात आले.

केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात अतीमहनीय व्यक्तींनाच प्रवेश : पुजार्‍यांचा आक्षेप  

मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.

आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्यातील मंदिरांचे सुशोभीकरण होणार !

गोवा पर्यटन विकास महामंडळाने केपे, सत्तरी, काणकोण आणि सावर्डे येथील मंदिरांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे गोव्याची प्रतिमा ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रचलित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सनातन धर्म नष्ट करण्याच्या गोष्टी करणारे उदयनिधी यांच्या बहिणीने मंदिरात जाऊन घेतले दर्शन !

सेंथमराई यांचा भाऊ उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट करण्यात येईल’, असे विधान केले असल्याने सेंथमराई मंदिरात गेल्याने राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे.