सियालकोट (पाकिस्तान) येथे ७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडले !

  • मंदिरातील अद्भुत नक्षीकाम पाहून भाविक आचंबित !

  • मंदिर आजही भक्कम स्थितीत !

‘शिवाला तेजा सिंह’ हिंदु मंदिर

सियालकोट (पाकिस्तान) – येथे गेल्या ७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडण्यात आले. ‘शिवाला तेजा सिंह’ असे या मंदिराचे नाव आहे. हे मंदिर उघडल्यानंतर मंदिरातील नक्षीकाम पाहून भाविक आचंबित झाले. हे मंदिर पाहून ‘ते इतके जुने आहे’, असे जराही वाटत नाही. हे मंदिर आजही अत्यंत सुंदर आणि भक्कम स्थितीत आहे.

फाळणीनंतर पाकमधील हिंदूंची दुःस्थिती झाली. फाळणीच्या पूर्वी तेथे जितकी मंदिरे होती, त्यांपैकी अर्ध्याहून अधिक पाडण्यात आली. काही अर्धवट पाडून तशीच राहिली, तर काही मंदिरे बंद करण्यात आली होती. सियालकोट येथील मंदिर, हे त्या वेळी बंद करण्यात आलेल्या मंदिरांपैकीच एक आहे. वर्ष २०१९ मध्ये हे मंदिर उघडण्याचा आदेश तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला होता. आता या मंदिरात देवतांच्या मूर्तींची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून लवकरच पूजा-अर्चाही चालू करण्यात येणार आहे. हे मंदिर उघडल्यानंतर उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’ असा जयघोष केला.