२ पोलीस अधिकारी निलंबित, तर एका महिला पोलिसाचे स्थानांतर !

राज्याला हादरवून टाकणार्‍या भंडारा येथील महिलेवरील अत्याचार प्रकरणात आतापर्यंत २ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी अद्याप पसार आहे. अत्याचार झाल्यानंतर पीडिता लाखणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती; पण तिच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी दिला ! – संजय शिरसाट, आमदार

बंडखोरांना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरता येण्यासाठी बळ दिले जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ६ ऑगस्ट या दिवशी एका दैनिकाशी बोलतांना दिली.

केदार दिघे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संमत !

दिघे यांच्याविरुद्ध बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा जनतेशी संबंध !

मंत्रीमंडळाचा विस्तार होत राहील आणि सत्ताधारीही पालटत रहातील; परंतु ज्या वेळी सत्ताधार्‍यांना ‘आम्ही जनतेशी बांधील आहोत’, याची जाणिव होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने लोकशाही ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल !

दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाचे दायित्व पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे दायित्वकडे स्वतःकडे घेतले आहे

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून समन्स !

बलात्कार पीडितेला धमकावल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्या विरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा हिंदु संघटनांच्या बैठकीत एकमुखी निर्णय !

नुकतीच शासकीय विश्रामधाम येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकत्रीकरण’ आणि ‘विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण’ या दोन विषयांच्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

शिवसैनिकांवरील कारवाईच्या प्रकरणी शिवसेना नेत्यांकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार

पुणे पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह अन्य सेना नेत्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन या घटनेत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

न्यायनिवाडा होईपर्यंत पक्षचिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नका !  

सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह रहाणार आहे. या निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना न्यायालयाकडून तूर्त दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांतील अधिवक्त्यांकडून विविध सूत्रांवर युक्तीवाद !

धनुष्यबाण चिन्ह हवे; मात्र उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नसल्याची शिंदे गटाची सर्वाेच्च न्यायालयात प्रथमच मान्यता !