सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या याचिकेवर ३ ऑगस्ट या दिवशी सुनावणी !

शिवसेना पक्षावर कुणाचा दावा खरा आहे, हे पहाण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गट यांला नोटीस बजावली होती. या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली आहे.

९ घंट्यांच्या चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत कह्यात !

माझ्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ जुलै या दिवशी नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या आहेत.

हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेकांकडून टीका

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ‘हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या अंधारेबाईंना समवेत घेऊन हिंदुत्वाची लढाई लढणार का ?’, ‘विनाशकाले विपरितबुद्धी’ यालाच म्हणतात’, अशी टीका करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केली आहे.

हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या सुषमा अंधारे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती !

वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रचारक म्हणून त्यांनी काम केले होते. यापूर्वी सुषमा अंधारे यांनी हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम यांच्याविषयी सार्वजनिक सभांतून अवमानकारक वक्तव्य केले आहे.

पन्हाळागड येथे पर्यटकांना मद्यपान करू देणार्‍या ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर एका झुणका-भाकरी केंद्रावर काही जणांच्या गटाने मद्यपान केले होते. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसारित झाला होता. याविषयी पोलिसांनी ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद केला आहे.

शिवसेनेच्या वतीने पुरातत्व विभागाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ सेनापती कापशी (कोल्हापूर) येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन !

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे आणि पडझड यांविषयी सुस्त असणारा पुरातत्व विभाग बंद का करू नये ?

खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले ? – आमदार दीपक केसरकर

लोकांच्या घरांवर मोर्चे काढून आंदोलन करणे आतातरी थांबवा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असणारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

निवडणूक आयोगाची शिवसेनेतील दोन्ही गटांना नोटीस !

‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह मिळण्यासाठी बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना नोटीस दिली आहे. यासाठी आयोगाने ८ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत मुदत दिली आहे.