६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची अमरावती येथील चि. अन्‍वी अमोल वानखडे (वय ४ वर्षे) !

अन्‍वीने एखादी वस्‍तू मागितल्‍यास ‘ती महाग आहे. आता तुला याचा काही उपयोग होणार नाही. पुढे पाहू’, असे तिला सांगितल्‍यास ती लगेच ऐकते.

आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

मराठेकाका साधना करणारे असल्याने अनेकांना त्यांचा आधार वाटतो. या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया.

परीक्षेतील गुणांपेक्षा साधनेमुळे निर्माण झालेले सद्गुण महत्त्वाचे !

‘परीक्षेतील गुणांनी फक्त ती एक परीक्षा उत्तीर्ण होता येते. साधनेमुळे निर्माण झालेल्या सद्गुणांमुळे आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होता येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजप साधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान

जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !

पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान अन् हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान

‘पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान फक्त भौतिक आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करतात. याउलट हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान भौतिक अन्‌ सामाजिक विषयांबरोबर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करतात आणि ईश्‍वरप्राप्ती या ध्येयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात.’

मायेतील प्रेम करण्यातील लाभ आणि हानी

लाभ : मायेतील असले, तरी प्रेम केल्यावर दुसर्‍यावर प्रेम कसे करायचे, हे शिकायला मिळते. ज्याला हे माहीत नसते, त्याला प्रीतीच्या पातळीला जाणे अवघड जाते. तसेच त्याच्या प्रीतीत व्यापकत्व येत नाही. हानी : बहुतेक जण प्रेमात अडकत जातात, म्हणजेच मायेत गुंतत जातात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍यानुसार ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे अधिवक्‍ता रामदास केसरकर यांनी सौ. प्रमिला केसरकर यांच्‍यासाठी नामजपादी उपाय केल्‍यावर त्‍यांना वेदना सुसह्य होणे

आज, २७ ऑक्‍टोबर (आश्विन शुक्‍ल त्रयोदशी) या दिवशी सनातनच्‍या १२१ व्‍या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांचे पती अधिवक्‍ता रामदास केसरकर यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

विविध विचारसरणींच्या संदर्भात हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे आणि शेवटी ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, यांसंदर्भात असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मातील ‘कर्मकांड’ विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहे !

‘हिंदु धर्मातील ज्या कृतींना तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात, त्या कृतींचा अभ्यास केल्यास त्या विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहेत, हे लक्षात येऊन अभ्यासक नतमस्तक होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले