गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्‍लक

संन्‍याशांना ज्ञानयोगाने वैराग्‍य येते. काही जण वैराग्‍य पराकोटीला गेले की, संन्‍यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्‍यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्‍याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्‍यास घेऊन गेल्‍यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्रपटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणार्‍याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपट अधिक होतो.

समर्थ रामदासस्‍वामींनी दासबोधात केलेले सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

राष्‍ट्रपुरुष समर्थ रामदासस्‍वामी यांनी ग्रंथराज दासबोधाच्‍या पहिल्‍या दशकामध्‍ये सद़्‍गुरुस्‍तवन केले आहे. महान गुरूंना उपमा देण्‍यायोग्‍य कोणतीही गोष्‍ट किंवा वस्‍तू या नश्‍वर जगतात नाही. यासंबंधी विश्‍लेषण करत त्‍यांनी अत्‍यंत सुंदर शब्‍दांत गुरूंची महती वर्णिली आहे.

गुरुपौर्णिमेला ९ दिवस शिल्‍लक

ईश्‍वराचे मारक रूप काही शिकवण्‍यासाठी रागावले, तर त्‍याच वेळी ईश्‍वराचे तारक रूप म्‍हणजेच गुरु भक्‍ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्‍हणजे तारक रूपच रागावले, तर त्‍यांची क्षमा मागण्‍यावाचून दुसरा मार्ग नसतो.

गुरुस्‍तवन पुष्‍पांजली

राष्‍ट्रपुरुष समर्थ रामदासस्‍वामी यांनी ग्रंथराज दासबोधाच्‍या पहिल्‍या दशकामध्‍ये सद़्‍गुरुस्‍तवन केले आहे. महान गुरूंना उपमा देण्‍यायोग्‍य कोणतीही गोष्‍ट किंवा वस्‍तू या नश्‍वर जगतात नाही. यासंबंधी विश्‍लेषण करत त्‍यांनी अत्‍यंत सुंदर शब्‍दांत गुरूंची महती वर्णिली आहे.

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्‍लक

गुरुप्राप्‍ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्‍यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्‍यभर सातत्‍याने करीत रहाणे आवश्‍यक असते. 

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्‍लक

कार्यानुमेय सिद्धींच्‍या वापराची आवश्‍यकता असल्‍यास गुरु त्‍या त्‍या वेळी सिद्धी उपलब्‍ध करून देतात.  

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्‍लक

गुरु स्‍वत:च शिष्‍याला प्रश्‍न विचारून योग्‍य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्‍याद्वारे त्‍याच्‍या जीवनाला खर्‍या मार्गाकडे वळवतात !