अर्पणदात्‍यांनो, गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्‍या !

३.७.२०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा हा दिवस शिष्‍यासाठी अविस्‍मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्‍यांच्‍याकडून प्रक्षेपित होणारे शब्‍दातीत ज्ञान नेहमीच्‍या तुलनेत सहस्रपटींनी अधिक कार्यरत असते.

गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्‍लक

वेद, शास्‍त्र, स्‍मृती वगैरेंच्‍या बहुवाक्‍यतेचे एकवाक्‍यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्‍यांचे शब्‍दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा ?, हे गुरुकृपेने कळते.

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्‍लक

मंद प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता मध्‍यम साधनेने, मध्‍यम प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्‍त होते. 

गुरुपौर्णिमेला ३१ दिवस शिल्‍लक

गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्‍य वाईट कृत्‍ये करणे बर्‍याचदा टाळतो ! 

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्‍लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्‍याला पाझर फुटतो, त्‍याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्‍या दयाद्रवाने गुरु शिष्‍याला तारतात. 

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही.  गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !