याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब झाल्याच्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मंदिरांची भूमी ५ लाख २५ सहस्र एकरवरून ४ लाख ७८ सहस्र एकर इतकी झाली आहे.

देशातून जातपात कधी नष्ट होणार ?

मुंबई उच्च न्यायालयाने अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित करून २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका प्रविष्ट केली होती.

पोलिसांवरील अशी आक्रमणे कधी थांबणार ?

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्‍या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात पोलिसांसह ५ जण घायाळ झाले आहेत.

काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !

पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थानमधील काँग्रेस सरकारकडून लसीकरण होत नव्हते. हे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने सरकारला फटकारले आहे.

फेसबूकचा हिंदुद्वेष कायम !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक आणि ‘सनातन शॉप’ ही पाने बंद करण्यात आल्यानंतर समितीचे हिंदी पानही बंद करण्यात आले आहे, तसेच अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘फोरम फॉर हिंदू अवेकनिंग’चे पानही बंद करण्यात आले आहे.

संपूर्ण देशातच असे उपचार व्हावेत !

नवी देहली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान या रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या उपचारांमुळे आतापर्यंत कोरोनाचे ६०० रुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही.

धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या आधारे मदरशांना अनुदान का ?

केरळमधील मदरसे एका धार्मिक उपक्रमात सहभागी असतांना त्यांच्यासाठी राज्य सरकारने अर्थसाहाय्य करण्याचे कारणच काय ?, असा प्रश्‍न केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने केरळ सरकारला विचारला आहे.

कोरोना काळातील काँग्रेसचे जनताद्रोही धर्मांधप्रेम !

जयपूर (राजस्थान) येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्काराला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात धन्यता मानली.

धर्मनिरपेक्ष गांधीवादी याविषयी गप्प का आहेत ?

लक्षद्वीपमध्ये ९८ टक्के लोक मुसलमान आहेत. ११ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने येथे म. गांधी यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मुसलमानांच्या तीव्र विरोधामुळे सरकारने माघार घेतली.

जिहादचे शिक्षण कुठे मिळते ते जाणा !

लंडन येथील पाकिस्तानी वंशाच्या एका २९ वर्षीय माजी जिहादी आतंकवाद्याने ‘माझ्या आई-वडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची आणि मुसलमानेतरांचा द्वेष करण्याची शिकवण….