अधिक मासाच्‍या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.