मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही ! – ऊर्जा मंत्री राऊत, महाराष्ट्र

महापारेषणच्या वीजवाहिनीची देखभाल-दुरुस्ती चालू होती. सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

‘तनिष्क’च्या दागिन्यांमध्ये मुसलमानांसाठी ३५२, तर हिंदूंसाठी केवळ १ दागिना !

हिंदू धर्मनिरपेक्ष असल्याने आणि ते कधीही अशा प्रकारची माहिती घेत नसल्याने त्यांच्या माथी अन्य धर्मियांसाठी बनवण्यात आलेले दागिने मारले जातात अन् हिंदूंना त्याची माहिती नसते, हाही एक प्रकारचा ‘जिहाद’ असल्याचे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

लक्ष्मीदेवीचा अपमान करणाऱ्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा ! – अभिनेता कमाल आर्. खान

दिवाळीच्या काळात ज्या लक्ष्मीदेवीचे आपण भक्तीभावे पूजन करतो, त्याच देवीचा अपमान करणार्‍या चित्रपटाचे आतापासून होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा !

मुसलमानाशी विवाह करणार्‍या हिंदु महिलेचा सासरच्या कुटुंबियांनी छळ केल्याने उत्तरप्रदेश विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न

अशा प्रकारच्या विवाहाचा परिणाम काय होतो, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे बळी पडतात !

(म्हणे) ‘फादर स्टॅन स्वामी निर्दोष !’ – गोव्यातील चर्चप्रणित संघटना आणि ख्रिस्ती संघटना

भीमा-कोरेगाव प्रकरणी फादर स्टॅन स्वामी यांना कह्यात घेतल्याचे प्रकरण

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही !

दळणवळण बंदीच्या काळात ‘आध्यात्मिक बळ प्राप्त होण्यासाठीही शासनाने आवश्यक ती उपाययोजना करून मंदिरे उघडावीत’, असे भाविकांना वाटते. भाविकांच्या या श्रद्धेचा शासनाने अवश्य विचार करावा !

चिनी मालावर बहिष्कार टाकणे हे भारतियांचे आद्यकर्तव्य ! – (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

वर्ष २०२१ मध्ये चीनमधील ‘कम्युनिस्ट’ पक्षाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना काहीतरी भव्यदिव्य करायचे आहे. जगापुढे रूबाब दाखवायचा आहे. अशा स्थितीत भारतियांनी चिनी मालावर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवणे, हेच आपले आद्यकर्तव्य आहे, असे स्पष्ट मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्या

या प्रायोगिक लसीचा डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात होती.

कोरोनावरील लस वर्ष २०२१ च्या आरंभी मिळण्याची शक्यता ! – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

कोरोना विषाणूवरील लस वर्ष २०२१ च्या आरंभी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रीगटाला दिली. भारताला ही लस एकापेक्षा अधिक स्रोतांकडूनही उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सनदशीर मार्गाने शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा बांबवडे-मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) ग्रामस्थांचा निर्धार !

बांबवडे येथे ११ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात शिवभक्तांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी हटवला. ‘यासाठी लागणारी कोणतीही अनुमती घेण्यात आलेली नाही’, असे पोलिसांचे म्हणणे होते. याचा निषेध करत शाहूवाडी तालुक्यात उत्स्फूर्तपणे नागरिक, व्यापारी यांच्याकडून बंद पाळण्यात आला.