कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत पुण्यात ३ हॉटेलवर दंडात्मक कारवाई

नियमांचे पालन न केल्यामुळे महापालिका अधिनियम १९४९ अंतर्गत शुक्रवार पेठ येथील जयश्री गार्डन, हॉटेल पिकॉक आणि मल्हार बार यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी २ सहस्र ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. 

नगर येथे महाविद्यालयीन तरुणीशी अश्‍लील चाळे करणार्‍या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद

औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक आरशू पिरमोहम्मद पटेल याने बीड जिल्ह्यातून आलेल्या २१ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

वंदे भारत योजनेअंतर्गत विदेशातून पुण्यात येणार्‍या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी होणार

चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांना विमानतळावर प्रतीक्षा करणे शक्य नसल्यास, त्यांना हॉटेलमध्ये अलगीकरणात रहाण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना घरी अलगीकरणात रहावे लागेल, तर पॉझिटिव्ह आल्यास संस्थात्मक अलगीकरणात रहावे लागणार आहे, असे विमानतळ प्रशासनाने कळवले आहे. 

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीसह आयटीआय प्रवेशप्रक्रिया लांबणीवर

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतर आणि बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रक्रियाही रेंगाळत चालू आहे. आरक्षणावर प्रवेशप्रक्रिया अवलंबून असल्याने प्रवेशांचे काय होणार ?, असा संभ्रम पालक आणि विद्यार्थी यांच्यात असून प्रवेश प्रक्रियांसंदर्भात स्पष्टता देण्याची मागणी करण्यात येत आहे.

फ्रान्समधील शाळेत महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवणार्‍या शिक्षकाचा १८ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याकडून शिरच्छेद

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंचा धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करणार्‍यांची बाजू घेणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या हिंसाचारावर मात्र मौन बाळगतात !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली शस्त्र नसलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची पूजा !

हिंदूंच्या बहुतेक देवतांच्या हातात शस्त्रे असतात, ते शस्त्रधारी असतात, असे असतांना त्यांच्या हातात शस्त्रे न दाखवणे, हा एक मोठ्या षड्यंत्राचाच भाग आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन अशा मूर्तीशास्त्रविरोधी मूर्तींना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !  

राजस्थानमधील काँग्रेस सरकार राज्यातील मदरशांवर प्रती १५ ते २५ लाख रुपये खर्च करणार

आसाममधील भाजप सरकारने सरकारी मदरसे बंद केले; म्हणून आता काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी राज्यातील मदरशांवर सरकारी पैसा खर्च करत आहे, हेच यातून स्पष्ट होते !

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर बाजारात भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

केंद्रात भाजप सत्तेत असतांना उत्तरप्रदेश, बंगाल आणि केरळ येथे भाजपच्या नेत्यांची एका पाठोपाठ एक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

‘सनातन प्रभात’ नियतकालिके आता सुप्रसिद्ध ‘डेली हंट’ ‘न्यूज अ‍ॅप’वरही उपलब्ध !

‘डेली हंट’ हे भारतातील सर्वांत लोकप्रिय ‘न्यूज अ‍ॅप’ असून ते १४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतासमवेतच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे देश, तसेच आफ्रिका खंडातही हे अ‍ॅप वापरले जाते. या ‘अ‍ॅप’वर आता ‘सनातन प्रभात’ची सर्व भाषांमधील लेख/वृत्ते वाचता येणार आहेत.