मसूद अझहर भारतात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी पुन्हा सक्रीय

बालाकोट येथे जैश-ए-महंमदच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताने केलेल्या कारवाईनंतर जैशचा प्रमुख मसूद अझहर पुन्हा भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी सक्रीय झाला आहे.

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणार्‍या आत्मघाती आतंकवाद्यावर डॉ. झाकीर नाईक यांचा प्रभाव

हिंदुद्वेषी आणि जिहादी डॉ. झाकीर नाईक केवळ भारतासाठी नव्हे, तर जगासाठी धोकादायक आहेत. मलेशियात लपून बसलेले डॉ. झाकीर नाईक यांना भारतात आणून त्यांना शिक्षा करण्याचे धारिष्ट्य भाजप सरकार दाखवील का ?

श्रीलंकेच्या पॅगोडा शहरात बॉम्बस्फोट

श्रीलंकेतील पॅगोडा शहरात २५ एप्रिल या दिवशीही एक बॉम्बस्फोट झाला. कोलंबोपासून ४० किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

उमरगा (जिल्हा धाराशिव) येथे पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू

जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे पोलिसांच्या मारहाणीत ७० वर्षीय दत्तू मोरे या वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले. या घटनेच्या निषेधार्थ तलमोड गावातील गावकर्‍यांनी २५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून मृतदेहासह ठिय्या आंदोलन चालू केले होते.

गोमांसबंदी, नद्यांची स्वच्छता अशी सूत्रे निवडणुकीच्या प्रचारात हवीत ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

भारतातून गोमांसाची निर्यात कधी बंद होणार ?, नोटाबंदीमुळे झालेली हानी कशी भरून काढणार ?, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येची समस्या कशी सोडवणार ?

बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान अन् यजमानांना ‘गुरु’ मानून पतीसेवा करणार्‍या सौ. विजया नीलकंठ दीक्षित (वय ८६ वर्षे) यांनी गाठली ६७ टक्के आध्यात्मिक पातळी !

बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान अन् यजमानांना ‘गुरु’ मानून पतीसेवा करणार्‍या सौ. विजया नीलकंठ दीक्षित (वय ८६ वर्षे) यांनी गाठली ६७ टक्के आध्यात्मिक पातळी !

(म्हणे) ‘लिखित तक्रार आल्यास साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील अत्याचारांची चौकशी होऊ शकते !’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साध्वी प्रज्ञासिंह यांना छळणार्‍यांपैकी एक असणारे परमबीर सिंह यांना महाराष्ट्रातील भाजप सरकारने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस महासंचालक का बनवलेे ? त्यांची चौकशी करून त्यांच्यावर इतक्या वर्षांत कारवाई का केली नाही ?

गळ टोचून घेणार्‍या भाविकांवर गुन्हा नोंद करून पोलीस आणि देवस्थान न्यास यांना सहआरोपी करा ! – संभाजीनगर खंडपिठाचा आदेश

हिंदु धर्माप्रमाणे इतर पंथांतही विविध प्रथा आहेत. त्याविषयी कोणीही ‘ब्र’ काढत नाही. केवळ हिंदु धर्मातील प्रथांना लक्ष्य करून त्या नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले आहे का ?, अशी शंका आल्यास नवल वाटू नये !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now