हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ 

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचे दुष्परिणाम !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती होण्यामागील कारण !

राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्‍या जनतेला राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्‍या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !

‘सनातन प्रभात’चे महत्त्व !

‘सनातन प्रभातमधील ३० टक्के मजकूर साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात.

आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !

आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !

‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्‍चात्त्य विचारशैलीचा अंगीकार नाशाला कारणीभूत !

पाश्‍चात्त्य विचारशैलीचा अंगीकार नाशाला कारणीभूत !

‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्‍वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’

आत्महत्या करणारा म्हणजे शुद्ध चांडाळ ! – संत तुकाराम महाराज

आत्महत्या करणारा म्हणजे शुद्ध चांडाळ ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे.

विज्ञान म्हणजे बालवाडीतील शिक्षण !

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हास्यास्पद साम्यवाद !

हास्यास्पद साम्यवाद !

‘गरिबी असणे किंवा नसणे, यामागे ‘प्रारब्ध’ असे काही आहे’, हे ज्ञात नसलेले साम्यवादाच्या गप्पा मारतात आणि गरिबी असणारे किंवा नसणारे यांना समान करण्याचा प्रयत्न करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले