‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

२०.१०.२०२२ या दिवशीच्या अंकात ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आजच्या भागात धर्माभिमान्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि धर्माभिमान्यांनी दिलेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘काही दिवसांपासून मला फार भीती वाटायची. मी ‘परम पूज्य, परम पूज्य’ असे गुरुमाऊलींचे सतत स्मरण करण्यास आरंभ केला. प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात राहिल्याने मला गुरुस्मरणाचा ध्यास लागला.

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न केल्यामुळे मला चुका स्वीकारता येऊ लागल्या आहेत आणि आता माझ्या मनातील नकारात्मक विचार अल्प होत आहेत.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतले.

सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे

२६.१०.२०२२ (कार्तिक शुक्ल द्वितीया, भाऊबीज) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनतच्या आश्रमातील सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अभिजीत विभूते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिने तिच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले पत्र !

गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर),

माझ्या वाढदिवसाला आपल्या कोमल श्री चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

उभा भगवंत सद्गुरु स्वातीताईंच्या रूपात समष्टी तिरी ।

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी ३०.३.२०२१ या दिवशी साधकांचा समष्टी सेवेविषयी सत्संग घेतला. त्या वेळी मला भगवंताने पुढील ओळी सुचवल्या, त्या सद्गुरुचरणी अर्पण करते.

२ मास रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात राहिल्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता कानडे यांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘मी गेल्या २ मासांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात रहात आहे. ‘सर्व ठिकाणी परात्पर गुरुदेव आहेत’, असे मला जाणवते. माझ्या अंतरातून ‘परम पूज्य’, असा धावा चालू असतो आणि मला केवळ ‘परम पूज्य’, असाच स्वर ऐकू येत असतो.

सनातनचे आदर्श साधक !

‘समाजात प्रसार करतांना असे लक्षात येते की, अनेकांना ‘योग्य साधना म्हणजे काय ?’, हेच ठाऊक नसते. त्यातील काही जण साधना म्हणून जे काही करतात, ते सर्व स्वतःच्या मनाने करतात. साधनेमध्ये ‘स्वतःच्या मनाने साधना करणे’, ही साधनेतील पहिली आणि मोठी चूक आहे.

प्रत्येक हिंदूच्या हृदयात राममंदिर स्थापन होण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगून त्याप्रमाणे साधकांकडून आचरण करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘९.११.२०१९ या शुभदिनी भगवान श्रीरामाच्या कृपेनेच श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने ‘अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी भगवान श्रीरामाचीच आहे’, असा निर्णय दिला आणि राममंदिर बांधण्याचे समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले.