काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.

आळंदीमध्ये (जिल्हा पुणे) माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यास भाविकांची गर्दी !

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहस्रो भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले

उत्तम संस्कार जोपासून देशाचे उत्तम नागरिक म्हणून सिद्ध व्हा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया

भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे त्यागपत्र !

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी १२ जुलै या दिवशी जिल्हाध्यक्ष पदाचे त्यागपत्र दिले. एका महिलेने देशमुखांनी फसवल्याचे सांगत ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक माध्यमावर प्रसारित केला.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणार्‍यांना फाशी द्या !

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणार्‍यांना फाशी द्यावी, तसेच हत्येसाठी साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरूडे यांच्याकडे केली आहे.

राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा अग्रस्थानी !

डेंग्यूच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा अग्रस्थानी आहे. जूनअखेर राज्यात डेंग्यूचे १ सहस्र १४६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे १६ जणांचे बळी

नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात पुलावरून पाणी वहात असतांनाही चालकाने गाडी पुलावर घातल्याने मध्यप्रदेशातील एकाच कुटुंबातील ६ जण वाहून गेले. नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एका ६ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जण, तर नंदुरबार जिल्ह्यात २ महिला वाहून गेल्या आहेत.

नाशिक येथील सप्तशृंगीदेवी मंदिर २१ जुलैपासून दर्शनासाठी ४५ दिवस बंद !

११ जुलै या दिवशी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळून पायर्‍यांवर पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यात ५ भाविक घायाळ झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी विश्वस्तांनी ही माहिती दिली.

गोपाळकाल्यासाठी गोपाळपूरनगरी वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली !

आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. मागील ५ ते ६ दिवसांपासून पंढरपूरमध्ये आलेले भाविक गोपाळकाल्यासाठी उपस्थित होते.

कधीच अंगार विझणार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही’, गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील शब्दांत त्यांचे राजकीय गुरु बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत हिंदुत्वाचा अंगीकार केल्याचा पुनरुच्चार केला.