सोलापूर – भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी १२ जुलै या दिवशी जिल्हाध्यक्ष पदाचे त्यागपत्र दिले. एका महिलेने देशमुखांनी फसवल्याचे सांगत ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक माध्यमावर प्रसारित केला. श्रीकांत देशमुख यांच्यासंदर्भात मागील सप्ताहात मुंबई येथे भाजपच्या महिला पदाधिकार्याकडून ‘हनीट्रॅप’चा प्रकार झाल्याची चर्चा होती. या प्रकरणी देशमुख यांनी संबंधित महिलेने त्यांच्याकडून पैसे उकळले, तसेच अपकीर्ती करण्याची भीती दाखवत पैसे आणि घर यांची मागणी करत असल्याची तक्रार मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती.