‘गूगल मॅप्स’कडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर !

आता ‘गूगल मॅप्स’वर ‘औरंगाबाद’ असे शोधले असता मराठीत औरंगाबाद आणि इंग्रजीत ‘संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’ असे शोधले असता मराठीत उस्मानाबाद अन् इंग्रजीत ‘धाराशिव’ असा उल्लेख आढळतो.

रायगड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

रायगड जिल्ह्यात १३ जुलै या दिवशी विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. तेथे मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

पावसामुळे राज्यातील २ लाखांहून अधिक हेक्टर शेतीची हानी !

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.

मीरारोड येथे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या महिला प्रदेशाध्यक्षांवर आक्रमण

आक्रमणकर्त्यांनी सुलताना यांची चारचाकी थांबवली आणि सुलताना यांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आक्रमण केले. यात त्या गंभीर घायाळ झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी !

शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांची शिंदे गटाकडून युवासेना राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

मुळशी (जिल्हा पुणे) तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के : ५०० मीटर भूमी दुभंगली !

टाटा पॉवरने ही भूकंपाची स्पंदने नसून भूमीतील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरूपाच्या आघातजन्य घटनांमुळे धक्के बसल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांना निवेदन

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे, या प्रमुख मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जुलै या दिवशी पन्हाळा गड येथील पुरातत्व विभाग, तहसीलदार, तसेच नगरपरिषद येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध !

आरबीआयने सांगितले, ‘‘ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण जमा रकमेतील १५ सहस्रांपेक्षा अल्प रक्कम काढण्याची अनुमती दिली जाऊ शकते.’’

वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा !

या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिले. विषबाधा झालेल्यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.