चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार !

अखिलेश चौबे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या माहितीपटाचा ‘प्रोमो’ मागील ३ दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या माहितीपटामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

दंगलीच्या गुन्ह्यात अटकेतील २४ संशयितांच्या जामिनावर १३ जुलैला सुनावणी !

शहरातील दंगलप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अन्वेषण अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सरकारी अधिवक्त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली.

दुकानांचे नामफलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी कारवाईला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

दुकानांचे नामफलक मराठीत करणार्‍या राज्यशासनाच्या आदेशाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. शासनाच्या निर्णयाला ‘हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन’कडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

‘अनन्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘पोस्टर’द्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबन !

हिंदूंनो, देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ते करणार्‍यांना संघटितपणे विरोध करून पुन्हा असे धाडस न करण्यास भाग पाडा !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

नीरा नदी ओलांडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ५ जुलैच्या सकाळी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे आगमन झाले. या वेळी संत तुकाराम महाराजांचे अश्व आणि पादुका यांचे पूजन करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दर्शन घेतले.

(म्हणे) ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ होऊ देणार नाही !’ – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ कधीच होऊ देणार नाही. या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढणार आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी समिती स्थापन करण्यात येईल.

नाशिक येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात आढळले वन्य प्राण्यांचे अवयव !

येथील तेली गल्ली येथील दीपक चांदवडकर यांच्या मालकीच्या ‘सुकामेवा आणि काष्ट औषधी’ दुकान क्रमांक ३ वर वन विभागाने ५ जुलै या दिवशी धाड टाकली. तेथे त्यांना वन्य प्राण्यांचे विविध अवयव आढळून आले.

मुंबई महापालिकेच्या मंडईमधील दुर्घटनेतील आरोपीवर कारवाई करण्यास आयुक्तांचा नकार !

माझगाव येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण मृत्यूमुखी पडले होते. ही दुर्घटना होऊन ९ वर्षे उलटूनही आरोपी असलेल्या महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर फौजदारी कारवाई करण्यास पालिकेच्या आयुक्तांनी नकार दिला.

शरद पवार यांची भेट घेतली, ही अफवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेतचे माझे छायाचित्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

संभाजीनगर येथील आकाशवाणीच्या निर्णयाचा ५० हौशी कलावंतांना फटका !

आता प्रतिदिन स्थानिक पातळीवर प्रसारित होणारे कार्यक्रम आठवड्यातून एकदा किंवा देशपातळीवर एकाच ठिकाणाहून प्रसारित करण्याचा निर्णय आकाशवाणीने घेतला आहे.