किनारपट्टीवरील अवैध कृत्ये थांबवा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पोलीस महासंचालकांना आदेश

असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?

बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !

राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.

विधवा महिलांच्या नावापूर्वी ‘गं.भा.’ लिहिण्याच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांकडून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न !

काही महिला संघटनांनी ‘विधवा महिलांच्या नावापूर्वी लिहिण्याचे विविध उल्लेख महिला आणि बालविकास विभागाकडे पाठवले. ही सर्व नावे लोढा यांनी चर्चेसाठी सचिवांकडे पाठवली आहेत. यामध्ये ‘गंगा-भागीरथी’ नावावरून नेत्यांनी टीका केली आहे.

समृद्धी महामार्गावर ५६० वाहनांची पडताळणी !

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहन पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. ३ दिवसांत ५६० वाहनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ६७ वाहने अयोग्य स्थितीतील होती.

भगवान परशुराम परिक्रमेस पुणे येथून प्रारंभ !

श्री भगवान परशुराम जन्मोत्सवा’निमित्त गेले ८ वर्षे नगर ते भगवान परशुराम जन्मस्थान जनापाव (मध्यप्रदेश) अशी परिक्रमा काढली जाते. या वर्षीपासून ही परिक्रमा पुणे येथून प्रारंभ होऊन नगर – छत्रपती संभाजीनगर – माहूर मार्गे जनापाव येथे जाणार आहे.

टँकर लॉबीत राजकीय नेत्यांची सक्रीय भूमिका पडताळून पहावी !

नवीन १ सहस्र ६८० कोटी रुपये निधीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे स्थानांतर करू नये, असा आदेशही खंडपिठाने दिला आहे.

राज्यात मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचाराच्या २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद !

वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ या ३ वर्षांत राज्यात घडलेल्या अशा घटनांचा आलेख सतत वाढता असून मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद पोलिसांत झाली आहे.

नवीन शैक्षणिक धोरण जूनपासून राबवणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

राज्यात जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार !

यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील

नांदेड येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नांदेड येथील श्रीरामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत प.पू. कालीचरण महाराजांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.