मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पोलीस पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू !

पोलीसदलात कार्यरत असणार्‍या व्यक्तीलाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेची काय अवस्था ? हे सर्व पालटण्यासाठी कर्तव्यदक्ष, संवेदनशील अधिकारी हवेत !

सिंहगडाच्या ‘कल्याण दरवाजा’ आणि परिसर संवर्धनाच्या कामास एप्रिलमध्ये प्रारंभ होईल ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गडाच्या विकासाकरता निधी संमत झाला आहे.

सिंधुदुर्ग : मालवण आणि कणकवली येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मी सावरकर’ लिहिलेल्या भगव्या टोप्या आणि ‘आम्ही सर्व सावरकर’, असे फलक हाती घेतलेले सहस्रो सावरकरप्रेमी मालवण आणि कणकवली शहरांत झालेल्या ‘स्वा. सावरकर गौरव यात्रे’त सहभागी झाले होते.

गोव्यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये वाढ !

प्रत्येक मासाला सुमारे २ प्रकरणे ! समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते यातून लक्षात येते ! समाजाचे स्वैराचारी वर्तन रोखणे आणि समाजाला धर्मशिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे !

गोवा : महिलेवर आक्रमण करण्याची ३ दिवसांतील दुसरी घटना

परप्रांतीय गोव्यात कामानिमित्त येऊन येथे गुन्हेगारी कृत्ये आणि महिलांचा विनयभंग करत आहेत. सरकारने यावर त्वरित ठोस उपाययोजना काढणे आवश्यक ! या घटनांमुळे गोव्याचे नाव अपकीर्त होत आहे !

विवाहाच्या आधी करण्यात येणारे छायाचित्रीकरण बंद !

विवाहाच्या संदर्भात पाश्चिमात्यांचे केले जाणारे अंधानुकरण रोखण्यासाठी असे निर्णय घेणे उचित !

सोलापूर येथे समाजकंटकांकडून गोरक्षकाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !

जे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते !

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट !

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ४ एप्रिलला सकाळी अमरावतीच्या दिशेने जाणार्‍या शिवशाही बसला अचानक आग लागली. बसमध्ये १६ प्रवासी होते. प्रवासी, बसचालक आणि वाहक बसमधून उतरल्याने अनर्थ टळला.

पाण्यावर तरंगणार्‍या बाबांना आव्हान देणार्‍या अंनिसची फजिती, अंनिसचे प्रकाश मगरे पाण्यात बुडाले !

प्रसिद्धीमाध्यमांपुढे मात्र अंनिसवाल्यांचा जिंकल्याचा खोटा दावा ! अंनिसचा खोटारडेपणा ! यातून अंनिसवाल्याची वृत्ती दिसून येते.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तांचा ‘पी.एम्.पी.’ संचालक मंडळामध्ये समावेश !

पी.एम्.पी.कडून पी.एम्.आर्.डी.ए.च्या परिसरामध्ये ११३ मार्गांवर ४९० बसगाड्यांनी सेवा दिली जाते. ग्रामीण भागात सेवा देण्यामुळे संचालन तुटीमध्ये वाढ होत होती.