पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक, तसेच क्रीडा साहित्‍याचा अभाव !

महापालिकेच्‍या १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक आहेत. २२ शाळांना मैदान नाही, तर १७ शाळांची मैदाने छोटी असून ती अपुरी पडत आहेत. अनेक शाळांमध्‍ये क्रीडा साहित्‍यही उपलब्‍ध नाही.

हमासचे समर्थन करणार्‍यांवर राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी ! – हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

पॅलेस्‍टाईन येथील हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण करून १ सहस्र ४०० हून अधिक नागरिकांची हत्‍या केली. शेकडो महिलांवर बलात्‍कार करण्‍यासह लहान मुलांचा शिरच्‍छेद केला.

हवेची गुणवत्ता सुधारण्‍यासाठी ‘रोड वॉशर’ प्रणालीचा उपयोग करणार !

फटाके, वाहनांचा धूर आणि बांधकाम यांमुळे शहरातील हवेची पातळी धोकादायक झाली आहे. हवेच्‍या गुणवत्तेत सुधारणा करण्‍यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत.

पुणे शहरात प्रदूषण नियंत्रणात ठेवण्‍यासाठी महापालिका २० ठिकाणी पाण्‍याची कारंजी उभारणार !

महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्‍या मार्गदर्शक सूचनांवरून महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांना प्रारंभ करण्‍यात आल्‍या आहे. अती रहदारीच्‍या ठिकाणी पाण्‍याचे कारंजे उभारण्‍याचे नियोजन असून पहिल्‍या टप्‍प्‍यात २० ठिकाणी कारंजी उभारण्‍यात येतील.

त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत प्रतिदिन पहाटे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात काकडा प्रज्‍वलित करण्‍यास प्रारंभ !

श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिदिन पहाटे काकडा प्रज्‍वलीत करण्‍यास प्रारंभ करण्‍यात आला असून हा काकडा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत प्रज्‍वलित केला जाणार आहे. मशालीच्‍या मंद उजेडात पहाटे २ वाजता मंदिराच्‍या शिखराच्‍या टोकावर काकडा प्रज्‍वलित केला जातो.

२६ ऑक्‍टोबर २०२३ ते २६ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत साजरा होत आहे जन्‍मशताब्‍दी महोत्‍सव !

या निमित्ताने इंदूर येथे मासाच्‍या प्रत्‍येक रविवारी भाजी-पुरी (बालभोग) वाटप आणि मोरटक्‍का येथील नर्मदातीरावर अमावास्‍येला भाजी-पुरी (बालभोग) वाटप करण्‍यात येणार आहे. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ लाख जप लिखित स्‍वरूपात करण्‍याचे ठरवण्‍यात आले आहे.

राज्‍यातील मध्‍यवर्ती कारागृहात आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवणार !

मुंबई मध्‍यवर्ती कारागृह, तळोजा मध्‍यवर्ती कारागृह, येरवडा मध्‍यवर्ती कारागृह आणि ठाणे मध्‍यवर्ती कारागृह या चार कारागृहांत सीसीटीव्‍ही कॅमेरे अन् पडताळणी यंत्रे (बॉडी स्‍कॅनर) बसवण्‍यात येणार आहेत.

पुणे येथील ‘रुबी हॉल क्‍लिनिक’मध्‍ये लैंगिक छळ प्रकरणी दोघांवर गुन्‍हा नोंद !

गेल्‍या सप्‍ताहामध्‍ये ‘रुबी हॉल क्‍लिनिक’च्‍या देयक विभागातील (बिलिंग डिपार्टमेंट) मिताली आचार्य या कर्मचारी महिलेने आत्‍महत्‍या केली होती. ‘रुबी’ प्रशासनाच्‍या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्‍याचा आरोप शिवसेनेने केला होता.

प्रदूषण वाढवणारे फटाके वाजवणार्‍या १५० हून अधिक जणांवर गुन्‍हे नोंद !

केवळ गुन्‍हे नोंद करून न थांबता संबंधितांना कठोर शिक्षा केल्‍याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

नवी मुंबईची पहिली मेट्रो आजपासून धावणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते या मेट्रोच्‍या मार्गिकेचे उद़्‍घाटन करण्‍यात येणार होते; पण आता मुख्‍यमंत्री शिंदे यांच्‍या आदेशानंतर ही चालू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.