पुणे – शहरातील नामवंत ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये काम करणार्या महिलेचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. मानव संसाधन विभागाचे प्रमुख प्रभाकर श्रीवास्तव आणि टेक्निशीयन (तांत्रिक कर्मचारी) बाळकृष्ण शिंदे यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘शारीरिक सुखाची मागणी केली आणि ती पुरवली नाही, तर कामावरून काढण्याची धमकी दिली’, असे ४५ वर्षीय महिलेने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. हा प्रकार २१ एप्रिल २०२३ आणि शेवटच्या सप्ताहामध्ये घडला आहे.
गेल्या सप्ताहामध्ये ‘रुबी हॉल क्लिनिक’च्या देयक विभागातील (बिलिंग डिपार्टमेंट) मिताली आचार्य या कर्मचारी महिलेने आत्महत्या केली होती. ‘रुबी’ प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.
संपादकीय भूमिकाकेवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !