महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता !

भाजपने सरकार स्थापनेच्या विषयी कायदेशीर चाचपणी चालू केली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली.

डॉ. मुखर्जींच्या बलीदानामुळे काश्मीर आज भारतात ! – प्रकाश बिरजे, भाजप

आपल्या देशाच्या एका राज्यात भारतियांना प्रवेश करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेच्या कालावधीत डॉ. मुखर्जींचे निधन झाले. शामाप्रसादांच्या बलीदानामुळे काश्मीर भारतात राहिले.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे मनोरंजनासाठी विनाअनुमती पाळणे आणि झोपाळे यांची उभारणी !

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद (जिल्हा सातारा) येथील गोटे माळाजवळ विनाअनुमती मनोरंजनासाठी विविध पाळण्यांची उभारणी केली जात आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ‘मोबाईल ॲप’

आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना वारीविषयी माहिती मिळणे आणि अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यांसाठी ‘आषाढी वारी २०२२’ या ‘मोबाईल ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे.

सिंहगड येथे दरड अंगावर कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोक यांनी घटनास्थळी धाव घेतली अन् त्याला शोधण्याचे कार्य चालू केले.

पालखी सोहळ्याचे ‘ड्रोन कॅमेऱ्या’च्या साहाय्याने चित्रीकरण करण्यास प्रतिबंध !

हे प्रतिबंध खासगी दूरचित्रवाहिन्या, खासगी व्यक्ती आणि संस्था आदींसाठी असून २७ जूनच्या रात्री १२ ते ४ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहेत. नीरा नदीतील स्नानानंतर पालखी २८ जून या दिवशी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे.

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील ‘चिन्मय मूर्ती संस्थान’च्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश !

‘चिन्मय मूर्ती संस्थान’चे मठाधिपती पूजनीय माधवानंद महाराज यांच्या आज्ञेनुसार संस्थाननी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.

चिखली (बुलढाणा) येथे टाळ-मृदंगाच्या तालावर निघाली विवाहाची वरात !

बँड किंवा डीजे यांच्याऐवजी टाळ-मृदंगाच्या तालावर वरात काढणारे आदर्श वधू-वर !

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे शिवसैनिक आणि आमदार राजेंद्र पाटील यांच्या गटात झटापट !

जयसिंगपूर येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले अपक्ष आमदार आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी २७ जून या दिवशी निदर्शने केली.

वाई (जिल्हा सातारा) येथे भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण ! – शिवसेनेची तक्रार

निवेदनामध्ये म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार हा नगरपालिका आणि शासनाच्या निधीचा चुकीचा उपयोग करत आहे. या कामाचे देयक संबंधित ठेकेदारास देण्यात येऊ नये; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.