
भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा कार्यकाळ हा १६ वर्षे १० मास इतका मानला जातो; पण यात एक मेख आहे. ती म्हणजे नेहरू हे १५ ऑगस्ट १९४७ पासून १७ एप्रिल १९५२ पर्यंत निवडून आलेले पंतप्रधान नव्हते, तर ते गांधींनी निवडलेले आणि भारतियांच्या डोक्यावर बसवलेले पंतप्रधान होते. भारताची लोकसभेची पहिली निवडणूक १७ एप्रिल १९५२ या दिवशी झाली आणि १५ मे १९५२ या दिवशी लोकसभेचे पहिले अधिवेशन चालू झाले. यावरून नेहरूंचा खरा कार्यकाळ तेव्हापासून चालू होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे नेहरू आणि पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना करणे अयोग्य आहे. ती केवळ इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाशी होऊ शकते; कारण या दोघांनी निवडणुका लढवून यश मिळवले आहे. नेहरूंनी वर्ष १९५२, वर्ष १९५७ आणि वर्ष १९६२ या सलग ३ निवडणुका जिंकल्या, तर पंतप्रधान मोदी यांनीही वर्ष २०१४, वर्ष २०१९ अन् वर्ष २०२४ अशा सलग ३ निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतियांनी ‘नेहरू सर्वाधिक काळ पंतप्रधान होते’, या भ्रमातून बाहेर यावे.
– श्रीमती कमलिनी कुंडले, देवद, पनवेल. (३०.७.२०२५)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
प्रशासकीय अधिकार्यांनी अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?