काबुल (अफगाणिस्तान) येथील चिनी रेस्टॉरंटवर झालेल्या आत्मघाती आक्रमणात ७ जण ठार
काबुल (अफगाणिस्तान) – येथे १९ जानेवारीला दुपारी ‘चीन लांझोऊ बीफ नूडल्स’ नावाच्या चिनी रेस्टॉरंटमध्ये आत्मघाती बाँबस्फोट झाला. यात १ चिनी नागरिक आणि ६ अफगाणी नागरिक ठार झाले आहेत. यात अनेक जण घायाळ झाले आहेत. त्यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे. इस्लामिक स्टेटच्या ‘अमाक’ वृत्तसंस्थेने सांगितले की, अफगाण शाखेने चिनी नागरिकांना लक्ष्य करण्याच्या सूचीमध्ये समाविष्ट केले आहे. चीन सरकारकडून उघूर मुसलमानांच्या विरोधात वाढत असलेल्या दडपशाहीमुळे हे आक्रमण केले, असा दावा या आतंकवादी संघटनेने केला आहे.
पोलिसांचे प्रवक्ते खालिद जादरान यांनी सांगितले की, मृतांमध्ये अयूब नावाच्या एका चिनी नागरिकाची ओळख पटली आहे. हे चिनी रेस्टॉरंट चिनी मुसलमान अब्दुल मजीद, त्याची पत्नी आणि अफगाणी सहकारी अब्दुल जब्बार महमूद संयुक्तपणे चालवत होते. या रेस्टॉरंटचे बहुतांश ग्राहक चिनी मुसलमान होते. (चीनमध्ये मुसलमानांवरील अत्याचारांचा सूड उगवण्यासाठी चिनी मुसलमानांनाच ठार मारणे, यातून काय साध्य होणार ? – संपादक)

डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता