
निपाणी (कर्नाटक) : निपाणीचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहणसोहळा हा ३ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत होत असून तो भावपूर्ण वातावरणात, तसेच मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तरी त्यासाठी उत्सव समिती, नगरपालिका, तहसीलदार, आरोग्य यंत्रणा यांसह सर्व शासकीय यंत्रणांना भाविकांना सुविधा देण्यासाठी आणि यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना भाजपच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी केल्या.
Nippani: BJP MLA @ShashikalaJolle announces the grand prana prathishtapana of Village Deity Shri Mahalakshmi Devi
₹90 lakh sanctioned (MLA fund + Jolle family) for a magnificent temple
📅 3-11 February 2026
🍶 2-day liquor ban | 🏥 Temporary govt hospital pic.twitter.com/t1dCcI5BBO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 19, 2026

शासकीय विश्रामधाम येथे विविध विभागाचे अधिकारी, मंदिर उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.

आमदार शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, ‘‘देवीचे मंदिर प्रारंभी लहान होते. त्यामुळे हे मंदिर भव्य करण्यासाठी आपण आमदार फंडातून, तसेच जोल्ले परिवाराकडून ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वांच्या सहकार्यातून भव्य मंदिर उभारले जात आहे. यात्राकाळात २ दिवस शहरात कडक मद्यबंदी होणार आहे, तसेच मंदिराच्या परिसरात तात्पुरते शासकीय रुग्णालय चालू करण्यात येणार आहे. शहरवासियांनी ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीच्या उत्सवासाठी घरोघरी रोषणाई, सजावट करा आणि रांगोळ्या काढा.’’

आशिषभाई शाह म्हणाले, ‘‘गेल्या ३ वर्षांपासून भव्य प्रमाणात यात्रा साजरी होत आहे. नवीन मंदिरासाठी आमदार शशिकला जोल्ले यांचे मोठे सहकार्य असून आमदार प्रकाश हुक्केरी यांनी १० लाख रुपयांचा निधी, तर धर्मस्थळ संस्थेकडून ३ लाख रुपये देणगीसह इतर देणगीदारांनी मोठे सहकार्य केले आहे. जागतिक किर्तीचे आणि अयोध्या येथील प्रभु श्रीराम यांची मूर्ती बनवणारे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी नवीन मूर्ती बनवली आहे. २३ जानेवारी या दिवशी मुहूर्तमेढ आणि ध्वजारोहण होणार आहे. ३ फेब्रुवारी या दिवशी नूतन मूर्तीचे आगमन, गोमाता, कलशपूजन आणि सवाद्य मिरवणूक होणार आहे. ४ फेब्रुवारी या दिवशी श्री गणेशपूजन, तर ६ फेब्रुवारी या दिवशी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि कलशारोहण सोहळा होणार आहे. ८ फेब्रुवारी या दिवशी भव्य पालखी सोहळा, तर ९ फेब्रुवारी या दिवशी देवी याग आणि १० फेब्रुवारी या दिवशी कुंकूमार्चन, तर ११ फेब्रुवारी या दिवशी महाप्रसाद होईल.’’
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जयवंत भाटले, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, बंडा घोरपडे, योगिता घोरपडे, अभिजीत मुदकुडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !