
रामनाथी (गोवा) : राजस्थान राज्यात असलेल्या कोटा येथील प्रसिद्ध उद्योजक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. ताराचंद गोयल यांनी नुकतीच येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे मित्र श्री. रमाकांत (पंचकुला, हरियाणा), तसेच श्री. कैलाश मैलाना (डेहराडून, उत्तराखंड) हेही उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, तसेच ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. विक्रम डोंगरे यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र अन् धर्म प्रसाराच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
तिघांनी अत्यंत आस्थेने आणि जिज्ञासेने सर्वकाही जाणून घेतले. अध्यात्म, आध्यात्मिक संशोधन, स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत चुकांचा फलक, हिंदूसंघटनाचे कार्य आदी भाग त्यांना पुष्कळ भावला.
चुकांचा फलक पाहिल्यानंतर कर्मयोगी, तसेच ज्ञानयोगी असलेले श्री. गोयल यांनी ते स्वत:च्या जीवनातील विविध प्रसंगांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कशा प्रकारे पहाण्याचा प्रयत्न करत असतात, याविषयी स्वत:चे अनुभव प्रकट केले. श्री. रमाकांत यांची हरियाणा येथील पंचकुला येथे १ हस्र ५५० गायींची गोशाळा आहे. येथे ते आजारी अथवा घायाळ गायींचे संगोपन करतात. तर श्री. मैलाना हे डेहराडून येथील उद्योगपती आहेत.
(सौजन्य : @SanatanSanstha) |
या प्रसंगी सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी अतिथींचा सत्कार केला.
देशाला आध्यात्मिक स्तरावर पुढे नेण्याचे कुणीही न करत असलेले कार्य सनातन संस्था करत आहे ! – ताराचंद गोयल
या प्रसंगी श्री. गोयल म्हणाले की, संघ हिंदूसंघटनासाठी कार्यरत आहे. दुसरीकडे समाजाला चांगले अन्न मिळण्यासाठी आम्ही जैविक शेतीसाठी आवश्यक आर्थिक स्तरावर प्रयत्नरत आहोत, तर तुम्ही देशाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावर पुढे घेऊन जात आहात. अत्यंत आवश्यक आणि कुणीही न करत असलेले हे कार्य तुम्ही करत आहात.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी