अफगाणी नागरिकाची माहिती

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेल्यानंतर त्यांच्यातील व्यापारही अल्प होत चालला आहे. या सगळ्यात अफगाणिस्तान भारतासमवेत व्यापार वाढवत आहे. याविषयी स्थानिक अफगाणी लोकांनी सांगितले की, अफगाणिस्तानात पाकिस्तान, तसेच तुर्कीये या देशांच्या औषधांपेक्षा भारतीय औषधे प्राधान्याने वापरली जात आहेत. भारतीय औषधे केवळ स्वस्तच आहेत, असे नाही, तर दर्जाच्या संदर्भातही अधिक परिणामकारक आहेत, असा दावा तेथील नागरिक सामाजिक माध्यमांद्वारे करत आहेत.
फजल अफगाण या अफगाणी ‘ब्लॉगर’ने (ऑनलाईन लेख लिहिणार्याने) सांगितले, ‘अफगाणिस्तानात डोकेदुखीसाठी पाकिस्तान आणि तुर्कीये येथे बनवण्यात येणारी ‘पेरोल’ गोळी उपलब्ध असते. एका औषधाच्या दुकानात डोकेदुखीवरील गोळी घ्यायला गेल्यावर दुकानदाराने मला भारतात उत्पादित झालेली ‘पॅरासिटामॉल’ गोळीही दाखवली. या गोळीचा परिणाम अधिक चांगला असून ती ‘पेरोल’पेक्षा बरीच स्वस्त असल्याचे दुकानदाराने सांगितले. प्रत्यक्षातही मी ‘पॅरासिटामॉल’ घेतल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत माझी डोकेदुखी अल्प झाल्याचे मी अनुभवले.’
अफगाणिस्तानात दैनंदिन वापरातील बहुतांश वस्तू पारंपरिकरित्या पाकमधून येतात; कारण दोन्ही देशांची सीमा लागून असल्याने व्यापार सुलभ राहिला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याधील संबंधांमध्ये तणाव वाढला. अशात भारत इराणमार्गे अफगाणिस्तानला वस्तूंची निर्यात करतो.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !