देशात महाराष्ट्रातील अमरावतीपासून केरळपर्यंत ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर झालेल्या आक्रमणांच्या दाव्यांमुळे संतापाची लाट उसळली आहे; परंतु पोलिसांच्या नोंदी आणि कायदेशीर प्रावधाने (तरतुदी) अधिक गुंतागुंतीच्या अन् वादग्रस्त वास्तवाकडे निर्देश करतात.

१. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मप्रचारकांवर आक्रमण केल्याचा एका वृत्तवाहिनीचा तथ्यहीन दावा
वर्ष २०२५ चा शेवटचा कामकाजाचा दिवस हा केरळमधील लोकांसाठी धक्कादायक आणि चिंतेचा दिवस होता. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शिंगोरी गावात ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर आक्रमण झाल्याच्या वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमुळे राज्य जागे झाले. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त प्रसारित करतांना म्हटले, ‘निष्पाप धर्मप्रचारक आणि त्यांचे सहकारी गावातील एका मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित होते, तेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’चे प्रमुख धर्मप्रचारक फादर सुधीर विल्यम आणि त्यांच्या प्रचारकांवर आक्रमण केले. पोलीसही काही वेळातच घटनास्थळी पोचले, त्यामुळे धर्मप्रचारक आणि त्याचे सहकारी बचावले.’
२. ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून गावात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत असल्याविषयी गावकर्यांकडून तक्रार प्रविष्ट

‘पोलिसांनी पाद्र्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात नेले, त्यांचे जबाब नोंदवले आणि नंतर या पथकाला वरुड न्यायालयात नेण्यात आले. तिथे त्यांना जामिनावर सोडण्यात आले’, असे अहवालात म्हटले आहे. धर्मप्रचारकांवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. पाद्री सुधीर विल्यम यांच्या नेतृत्वाखाली गावात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत असल्याची तक्रार गावचे वयोवृद्ध लक्ष्मण देवीदास शेले यांनी पोलिसांकडे केली होती. गावकरी आणि पाद्री यांच्यात झालेल्या हाणामारीची माहिती पोलिसांना मिळताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेले यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे, ‘पांढरे कपडे परिधान केलेले काही बाहेरील लोक रितेश बोंडे या गावकर्याच्या घरी आले आणि त्यांनी ख्रिस्ती पंथाचा प्रचार करण्यास प्रारंभ केला.’ ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार ‘तक्रारदाराने आरोप केला आहे की, पाद्र्यांच्या गटाने गावकर्यांना पैसे देऊन त्यांचा धर्म पालटण्यासाठी चिथावण्याचा प्रयत्न केला. यामुळे गावात तणाव वाढला.’
३. भारतात ख्रिस्ती मिशनर्यांवर आक्रमणे होत असल्याचा दक्षिण भारतातील चर्चच्या प्रमुखांचा दावा

‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’ आणि ‘सी.एस्. आय. (चर्च ऑफ साऊथ इंडिया)’ यांच्या प्रमुखांनी सर्वप्रथम महाराष्ट्रभर क्रॉस लावण्याच्या मोहिमेवर असलेल्या ‘निष्पाप आणि प्रामाणिक’ पाद्र्यांवरील आक्रमणाचा निषेध केला. कॅथॉलिक बासेलियोस मार्थोमा मॅथ्यूज तिसरा याने ख्रिस्ती श्रद्धा आणि उपासना यांवरील वाढत्या आक्रमणांना तीव्र आक्षेप घेतला; परंतु या कॅथॉलिकांनी हिंदूंच्या निवासस्थानी पाद्री कोणत्या प्रकारची उपासना करत होते, हे उघड केले नाही. ‘सी.एस्.आय. बिशप कौन्सिल’चे सचिव मलयिल साबू कोशी चेरियन यांनी आरोप केला, ‘भारताच्या विविध भागातील गावांमध्ये काम करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांवरील आक्रमणे अविरतपणे चालू आहेत आणि हे घटनात्मक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.’ चेरियन यांनी त्यांच्या आरोपात आणखी भर घातली नाही; कारण त्यांना ठाऊक होते की, राज्यघटनेने लोकांना त्यांच्या पसंतीच्या धर्मावर विश्वास ठेवण्याचे, त्याचे पालन आणि त्याचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे; परंतु धर्मांतर करण्याचा अधिकार दिलेला नाही.
४. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्याकडून निषेध

केरळचे संकटात सापडलेले मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनीही धर्मांतर प्रकरणात गुंतलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर झालेल्या आक्रमणाचा निषेध केला. ‘विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने ‘सीपीआय (एम्)’विषयी अल्पसंख्यांकांच्या मनात चांगली भावना असायला हवी’, हे विजयन् जाणून आहेत.
५. मोदी सरकारने ख्रिस्ती मिशनर्याला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा ख्रिस्त्यांकडून उल्लेख नाही !
वर्ष २०१५ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानने अपहरण केलेल्या ख्रिस्ती मिशनर्याची सुटका करण्यात नरेंद्र मोदी सरकारने केलेले चांगले काम हे लोक विसरतात. वर्ष २०१४ मध्ये हेरात प्रांतातून अपहरण झालेल्या ॲलेक्सिस प्रेम कुमारला केवळ केंद्रातील भाजप सरकारने राबवलेल्या अत्याधुनिक मुत्सद्देगिरीमुळे मृत्यूपासून वाचवण्यात आले. ॲलेक्सिस प्रेम कुमार हा एक ख्रिस्ती पाद्री तालिबानी कमांडोच्या इच्छेविरुद्ध या प्रदेशात धर्मांतर करत होता. या कमांडोनी त्याला त्याच्या निर्मात्याला भेटायला स्वर्गात पाठवण्यासाठी बळजोरीने अज्ञात ठिकाणी नेले होते, तेव्हा मोदी सरकारच्या रूपात दैवी कृपा प्रकट झाली. ‘कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय)’ आणि पाद्री या एकाच गोष्टीविषयी बोलत नाहीत; कारण ‘परकीय प्रदेशांतील मृत्यू कक्षांपासून धर्मप्रचारकांना वाचवणे, हे सरकारचे उत्तरदायित्व आहे’, असा त्यांचा समज आहे.
६. ‘खोट्या बातम्या’ दाखवण्याचा चर्च अन् वृत्तवाहिन्या यांचा प्रयत्न आणि हिंदूंची विस्मृती
चर्च अशा घटनांचा ‘राईचा पर्वत’ बनवण्यात पारंगत आहे. महाराष्ट्रातील शिंगोरी गावातून मिळालेल्या वृत्तावरून ख्रिस्ती संस्थेने भांडवल केले आणि त्याला जागतिक बातम्यांमध्ये स्थान दिले. ‘अल्पसंख्य भारतात सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत’, असे भोळसट वाचकांना वाटले असेल; परंतु सत्य पूर्णपणे वेगळे आहे. ‘सत्याने पाय रोवण्यापूर्वीच एक खोटे जगाचा अर्धा प्रवास करू शकते’, या शतकानुशतके जुन्या म्हणीवर मिशनरी काम करतात.
मिशनर्यांवरील कथित आक्रमणांविषयीच्या बातम्यांमध्ये अचानक वाढ होण्यामागे नरेंद्र मोदी सरकारची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांच्या एका वर्गाच्या दुष्ट कारस्थानांना दिले जात आहे. ‘व्होट (मत) चोरी’च्या बहाण्याने सरकार पाडण्याच्या त्यांच्या मोहिमेत अपयशी ठरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या (गांधी) कुटुंबाने वर्ष १९७९ मध्ये तत्कालीन मोरारजी देसाई सरकार पाडण्यासाठी काम केलेल्या जुनी योजना कार्यान्वित केली आहे. जनता पक्षाचे ओ.पी. त्यागी यांनी संसदेत सादर केलेले ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयका’चा भरपूर लाभ झाला आणि देसाई सरकारने लोकसभेतील विश्वासदर्शक ठराव गमावला.
चर्चच्या मालकीच्या आणि संचालित असलेल्या वृत्तवाहिन्या अन् ख्रिस्ती व्यापारी किंवा व्यावसायिक यांच्या मालकीची वृत्तपत्रे भारतात ख्रिस्त्यांवर आक्रमणे होत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी अधिक वेळ काम करत आहेत. जनतेची (विशेषतः हिंदूंची) स्मरणशक्ती अल्प असल्याने ओडिशामध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या आणि वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रातील पालघर येथील जुना आखाड्यातील कल्पवृक्ष गिरी आणि सुशील गिरी यांची हत्या विसरली गेली आहे. एक किंवा दोन वृत्तवाहिन्यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतीय प्रसारमाध्यमांनी या बातम्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
भारतात बहुसंख्य हिंदूंना न्याय मिळत नाही !
प्रिय वाचकहो, भारतात २ प्रकारचे न्याय आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? एक बहुसंख्य हिंदूंसाठी, तर एक अल्पसंख्यांकांसाठी. ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांचे लोक कोणतेही गुन्हे केल्यानंतर मुक्त होऊ शकतात, तर हिंदूंना किरकोळ गुन्ह्यांसाठीही कठोर शिक्षा दिली जाते !
– श्री. कुमार चेल्लपन
७. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात केलेले धर्मांतर
‘भारतीय राज्यघटना आपल्या नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या धर्मावर विश्वास ठेवण्याचे, त्याचे पालन करण्याचे आणि त्याचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते; परंतु ते धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्य देत नाही’, हे आपल्याला जगाला सांगावे लागेल. भारतात धर्मांतर, विशेषतः ख्रिस्ती धर्मात सर्रासपणे केले जात आहे. चर्चने संपूर्ण ईशान्येकडील लोकसंख्येचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यात यश मिळवले आहे आणि हेच चिंताजनक पातळीवर पोचलेल्या फुटीरतावादी चळवळींचे मूळ कारण आहे.
८. पोलीस अधीक्षकांच्या विधानावरून ख्रिस्ती धर्मप्रचारक धर्मांतर करत असल्याचे स्पष्ट
‘पोस्ट स्क्रिप्ट’ (अतिरिक्त लिखाण वा ताजे लिखाण) म्हणून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पाद्र्याच्या अटकेच्या आणि जामीन संमत करण्याच्या सखोल चौकशीनंतर पत्रकारांना काय सांगितले, ते पाहूया. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धर्मांतर, प्रलोभन किंवा दबाव सहन केला जाणार नाही. जर नागरिकांना अशी कोणतीही कृती दिसली, तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे.’’ एका भारतीय पोलीस प्रशासकीय अधिकार्याने पत्रकारांना जे सांगितले, त्यावरून तेथील परिस्थिती लक्षात येते.
‘ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर झालेल्या आक्रमणांच्या बातम्यांसह आंध्रप्रदेश आणि बिहार या राज्यांचे मुख्यमंत्री अनुक्रमे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना समवेत घेतल्यास मोदी सरकार पाडले जाऊ शकते’, अशी आशा ‘व्होट (मत) चोरी’ टोळीने व्यक्त केली आहे. वर्ष १९७८ मध्ये ते यशस्वी झाले; परंतु या वेळी ते यशस्वी होतील कि नाही ? याविषयी शंका आहे.
– श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?