भारतातील अमेरिकेच्या राजदूतांचे विधान

(‘श्रीमान पंतप्रधान, तुम्ही महान आहात’: डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना संदेशासह स्वाक्षरी केलेला फोटो पाठवला)
नवी देहली : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणाव टोकाला पोचला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर भारत दौर्यावर आले आहेत. दक्षिण आशियातील राजकीय आणि धोरणात्मक समीकरणांचे सखोल ज्ञान असलेले व्यक्तीमत्त्व म्हणून अमेरिकेच्या राजकारणात त्यांची ओळख आहे. त्यामुळेच दोन्ही देशांतील संबंध पुन्हा स्थिर करण्याचे दायित्व त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. भारत दौर्यावर आलेल्या सर्जियो गोर यांनी माध्यमांशी संवाद साधतांना ‘भारतासमवेत व्यापार करार अंतिम टप्प्यावर नेण्यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे’, असे स्पष्ट केले. यासमवेतच त्यांनी डॉनल्ड ट्रम्प निकट भविष्यात भारत दौर्यावर येऊ शकतात, असेही सांगितले.
🇺🇸🇮🇳 Statement by Sergio Gor, U.S. Ambassador to India
Donald Trump may visit India in the future
But even if Donald Trump visits India and praises the nation 🇮🇳, the real question remains; will he stand by those words later, or will they change with time? ⏳
PC: Pratidin Time pic.twitter.com/IK40jn5t2z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2026
अमेरिकेच्या राजदूतांची महत्त्वाची विधाने !
१. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील मैत्री खरी अन् भक्कम आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध सर्वोच्च राजकीय पातळीवर भक्कमपणे टिकून आहेत.
२. खरे मित्र मतभेद ठेवू शकतात; मात्र अखेरीस ते परस्पर समजुतीने ते सोडवतातही.
अमेरिकेच्या राजदूतांच्या दौर्याचे महत्त्व !![]() गोर यांचा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे; कारण त्याची वेळ अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी अलीकडेच रशियावर दबाव आणण्यासाठी एक विधेयक सादर केले असून त्यामुळे भारतावर ५०० टक्के आयात कर लावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यास ट्रम्प यांची मान्यता मिळाल्यानंतर भारताची चिंता अधिक वाढली आहे.
अशा पार्श्वभूमीवर गोर भारतात आले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयी त्यांनी दिलेले संकेत तणाव अल्प करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. १३ जानेवारीला या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. |
३. भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहेे. जगातील सर्वांत जुने लोकशाही राष्ट्र आणि जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र यांच्यातील भागीदारी अधिक भक्कम करणे, हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहेे. (जगातील सर्वांत जुने लोकशाही राष्ट्रही भारतच आहे, हे दक्षिण आशियाविषयी ‘सखोल’ अभ्यास असणार्या सर्जियो गोर यांना ठाऊक नाही, हे नवल ! – संपादक)
४. अमेरिकेसाठी भारतापेक्षा अधिक महत्त्वाचा भागीदार कुणी नाही. दोन्ही देश खर्या अर्थाने धोरणात्मक भागीदार म्हणून एकत्र पुढे वाटचाल करतील.
संपादकीय भूमिकाट्रम्प भारतात येऊन भारताविषयी सकारात्मक बोलले, तरी त्यावर नंतर ते कायम रहातील का ? असा प्रश्न आहे ! |

भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले