आज सर्वसामान्य लोक ‘मोदी-शहा की कब्र खुदेगी’, अशा घोषणा ऐकून संताप व्यक्त करत आहेत. तो संताप चुकीचा नाही; पण दुर्दैवाने तो केवळ वरवरच्या घोषणांपुरताच मर्यादित रहात आहे. प्रत्यक्षात प्रश्न हा एखाद्या घोषणेचा नसून साम्यवाद्यांकडून सतत देशाच्या सार्वभौमत्वाला दिल्या जात असलेल्या आव्हानाचा आहे.

१. उमर खालिद आणि शरजिल इमाम यांच्याकडून देशातील सार्वभौमत्वाला नष्ट करण्याची भाषा
वर्ष २०१६ मध्ये उमर खालिद याने देशाचे तुकडे करण्याची, तर वर्ष २०२० मध्ये शरजिल इमामने आसाम भारतापासून तोडण्याची आणि ‘चिकन नेकवर (ईशान्येतील ७ राज्यांना जोडणारा संवेदनशील भाग) केवळ मुसलमानांचा हक्क आहे’, असे उघडपणे घोषित केले होते.

ही केवळ सरकारविरोधी टीका नाही, तर भारताची एकात्मता, अखंडता आणि सार्वभौम अस्तित्व यांनाच नष्ट करण्याची भाषा आहे.

२. ‘उमर आणि शरजिल यांच्यावरील कारवाई म्हणजे राजकीय सूड’, असा साम्यवाद्यांकडून खोटा रेटा !
उमर खालिद आणि शरजिल यांनी ‘जामिया मुस्लिम स्टुडंट्स’सारख्या व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातून वर्ष २०२० मध्ये आंदोलनांचे समन्वय केल्याचेही पुढे आले. अंतर्गत संदेश, भाषण आणि रणनीती यांतून हे स्पष्ट झाले की, उद्देश केवळ निषेधाचा नव्हता, तर देशभर अस्थिरता निर्माण करून दंगली पेटवण्याचा होता. म्हणूनच ‘यूएपीए’च्या (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याच्या) अंतर्गत त्यांना जामीन नाकारण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य ठरवला. तरीही सार्वजनिक चर्चेत साम्यवाद्यांकडून हे सूत्र ‘राजकीय सूड’ किंवा ‘मतभिन्नतेवर कारवाई’, असाच रेटला जात आहे.
३. साम्यवाद्यांच्या यंत्रणेकडून बौद्धिक भेद करण्याचा प्रयत्न

२ दिवसांपूर्वी झालेल्या ‘जे.एन्.यू.’तील आंदोलनात साम्यवादी विचारसरणीचे गट ‘भगवा जला था, भगवा जलेगा जे.एन्.यू. में’ (भगवा जळाला होता, भगवा जळेल जे.एन्.यू.मध्ये), अशा घोषणा देत होते. या घटना काही अपवादात्मक किंवा निरुपद्रवी म्हणून कानाडोळा करावा, अशा नाहीत. एका संपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीविषयी उघडपणे द्वेष व्यक्त करणारी ही भाषा आहे. हीच विधाने इतर धर्माविषयी केली गेली असती, तर लगेच ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) ठरले असते; पण इथे हीच विधाने प्रगत, प्रतिरोधक किंवा क्रांतीकारी म्हणून देशात सर्वत्र पसरवली जात आहेत. यातून एक सातत्यपूर्ण दुहेरी निकष दिसतो. एका बाजूला हिंदु संघटनांकडून आलेली प्रत्येक गोष्ट धर्मांध, हुकूमशाही किंवा धोकादायक ठरवली जाते, तर दुसर्या बाजूला मात्र साम्यवादी अथवा तथाकथित पुरोगामी गट यांच्याकडून आलेली देशविरोधी किंवा हिंदुविरोधी भाषा ही नेहमीच संदर्भ, परिस्थिती आणि भावना यांच्या नावाखाली खपवली जाते; पण साम्यवादी ‘इकोसिस्टम (यंत्रणा)’, माध्यमे आणि समाजमाध्यमे यांवर सक्रीय असलेला त्यांचा बौद्धिक विचारवर्ग यामध्ये मोठी भूमिका बजावतो. ‘संघ, भाजप किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’च हिंदु-मुसलमान राजकारण करतात, असा एक साचा मुद्दाम बनवला गेला आहे. त्यामुळे इतर कुठल्याही बाजूकडून आलेली आक्रमकता, द्वेष किंवा विभाजनकारी भूमिकेकडे दुर्लक्ष करणे किंवा योग्य ठरवणे सोपे जाईल.
४. लोकशाही टिकवण्यासाठी सत्यनिष्ठा हवी !
खरेतर प्रश्न धर्माचा नाही, तर प्रामाणिकपणाचा आहे. जर देशविरोधी भाषा, हिंसक आव्हाने आणि सांस्कृतिक द्वेष चुकीचा असेल, तर तो कुठल्याही बाजूकडून आला, तरी चुकीचाच मानायला हवा. लोकशाही टिकवायची असेल, तर सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही एवढेच !
– कु. शांभवी थिटे, परराष्ट्र धोरणांच्या अभ्यासिका, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी देहली. (७.१.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !