|

नवी देहली : देहली उच्च न्यायालयाने देहली महानगरपालिकेला शाही जामा मशिदीच्या परिसरातील अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला. हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी न्यायालयाकडून दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
Delhi High Court orders Municipal Corporation of Delhi to survey illegal structures near Jama Masjid
• 2 months deadline for verification ⏳
• Allegations of land grabbing against Shahi Imam & relatives ⚠️
• Encroachments on public parks & land alleged 🏞️
• Illegal… pic.twitter.com/g7Er3YUpUG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2026
१. न्यायालयाने स्पष्ट केले की, महानगरपालिकेने या याचिकेतील आरोपांचा विचार करून त्यांतील दाव्यांची पडताळणी करावी. अवैध बांधकाम आढळल्यास कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात येईल.
२. या याचिकेत महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानांवरील अतिक्रमण आणि जामा मशिदीच्या परिसरातील अवैध बांधकामे हटवण्याची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक भूमीवर अवैध वाहनतळ, रुग्णालये आणि व्यापारी स्टॉल्स उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
३. याचिकेत म्हटले आहे की, मशिदीच्या भोवतीच्या मोकळ्या जागांवर शाही इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) आणि त्यांचे नातेवाईक यांनी अवैध बांधकामे केली आहेत. इमाम त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय मशिदीचा वैयक्तिक उत्पन्नासाठी वापर करत आहेत. हा प्रकार ‘धार्मिक पवित्रता पुरतत्व वारसा संरक्षण नियम’ आणि देहली महानगरपालिकेचा कायदा यांचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !