सध्या पेठेत मिळणारा ‘कलर मेंदी कोन’ शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हानीकारक असणे

‘सध्या पेठेत हाता-पायांवर मेंदी काढण्यासाठी कृत्रिम रंग असलेला ‘कलर मेंदी कोन’ विकत मिळतो. तो मेंदीच्या कोनसारखा दिसत असला, तरी त्यात मेंदीऐवजी रंग असतो.

१. या कोनने हातावर मेंदी काढल्यावर तिचा रंग नैसर्गिक मेंदी रंगल्यानंतरच्या रंगापेक्षा गडद आणि काळसर असतो.

कु. संध्या माळी

२. ही रंगीत मेंदी हातावर काढल्यावर ५ मिनिटांत रंगत असली, तरी त्यातील काळसर रंगामुळे मेंदीची नक्षी सात्त्विक न वाटता तामसिक वाटते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या हातावर अशी मेंदी काढलेली असते, तिला आध्यात्मिक लाभ होत नाही.

३. गडद आणि काळसर रंगामुळे हातावर काढलेल्या मेंदीकडे बघून आनंदाची स्पंदने जाणवत नाहीत.

४. ही रंगीत मेंदी लावल्यास तळहाताची आग होते आणि काही दिवसांनी मेंदी काढलेल्या ठिकाणची तळहाताची त्वचा निघते.

त्यामुळे हा ‘कलर मेंदी कोन’ शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हानीकारक आहे.’

(‘व्यक्तीला, परिणामी समाजाला आध्यात्मिक लाभ व्हावा आणि आनंद मिळावा’, हा आपल्या संस्कृतीतील पारंपरिक कृतींचा उद्देश आहे. नैसर्गिक रंग वापरल्याने व्यक्तीला शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ होतात. कृत्रिम रंग असलेला मेंदीचा कोन वापरल्याने शारीरिक अपाय होऊ शकतो.’ – संकलक)

– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२५)