
‘आर्टिफिशियल बेवरेज’ (कृत्रिम पेये) आणि ‘पॅक्ड फूड’ (पाकीटबंद अन्न) यांमध्ये भरपूर उलाढाल असणार्या भल्या मोठ्या आस्थापनाने हे घोषित केले आहे की, या वर्षाअखेरपर्यंत त्याच्या अमेरिकेतील उपलब्ध अन्न पदार्थातील ‘आर्टिफिशियल’ (कृत्रिम) रंग आणि काही हानीकारक / ‘सिंथेटिक’ (कृत्रिम) घटक काढले जातील. त्याऐवजी ते बीट आणि भाज्या यांचे रंग वापरतील. हे किमान बोलले गेले, ते ग्राहकांच्या वाढत्या दबावामुळे. आपल्याकडे काही हालचाल नाही; कारण त्यांचे योग्य आहे, आपल्यालाच जेव्हा फारसा फरक पडत नाही, तर आस्थापन असले वचन देईलच का ? त्याचा खप चालू आहेच.
खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरल्याचा दुष्परिणाम

सोडा, कोल्डड्रिंक, सिरप यांसारखी औषधे, गोळ्या, लॉलीपॉप, केक, जॅम, जेली, चिप्स आणि अशा असंख्य पदार्थांतून हे ‘सिंथेटिक’ रंग मुलांच्या पोटात जात असतात. ‘सप्लीमेंट’ (पूरक) स्वरूपात औषधे देतांना त्यातून प्रतिदिन हे रंग मुलांना दिले जातात. या रंगांमधील ‘रेड ४०’ हा रंग विशेषकरून मुलांमध्ये ‘हायपरॲक्टिव्हिटी’ (अतीक्रियाशीलता) आणि ‘अटेंशन, डेफिसिट, हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर’ (एकाग्रता, अस्थिरता आणि अतीक्रियाशीलता विकृती) यांचे प्रमाण वाढवतांना दिसतात. सतत खाल्ल्याने मोठ्या माणसात ‘अलर्जी’पासून पोटाचे आजार आणि ‘क्रोहन डीसिज’ (आतड्यांचा एक आजार)पर्यंत बरेच आजार याच्याशी निगडित केले गेले आहेत, संशोधनेही झाली आहेत, होत आहेत.
मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देतांना घ्यावयाची काळजी
१. रंगीबेरंगी गोळ्या मुलांना न देणे, वाढदिवसाला न वाटणे. चिक्की, सुकामेवा किंवा लेखनसामुग्री देता येईल.
२. खाऊसाठी लाह्या, चिवडा, फळे, मखाणे, चिक्की, लाडू, पराठा, पोळी असे पदार्थ देता येतील. ‘जॅम’ऐवजी मुरांबा अथवा साखरंबा निवडा.
३. लाल पाव भाजी, मंचुरियन, लाल पंजाबी सारण असलेले पदार्थ मिळत असतील, अशा खाण्याच्या जागा आवर्जून टाळणे. मुलांच्या वाढदिवसाला केक आणायचा असेलच, तर व्हॅनिला चॉकलेट, रवा किंवा फळांचा ताजा केक आणावा.
४. रंगीत सोडा आणि ‘कार्बोनेटेड’ पेय यांची चवही कधीच नाही, दिली तरी चालेल.
५. शाकाहारी असाल, तर मॉलमध्ये मिळणारे ‘कँडी स्टोअर्स’मध्ये (गोळ्यांच्या दुकानामध्ये) मिळणारे ‘मार्शमेलो’ (एक पदार्थ) ज्यावर मुलांच्या उड्या पडतात, ते ‘हॉट चॉकलेट’मध्ये घालून मुलांना देतांना त्यातील ‘जिलेटीन’ या घटकाविषयी आवर्जून वाचा.
६. उपाहारगृहामध्ये गेल्यावर मजा करायला आलो आहे, तर त्यांना ‘हवे ते’ आणि ‘हवे तितके’ खायला देत असतो. सध्या सगळ्यांचे सतत या ना त्या निमित्ताने उपाहारगृहामध्ये जाणे होत असते, अशा वेळी काय खायचे ? आणि किती वारंवार खायचे ? या भागाचे नियंत्रण करणे, हे लहानपणापासून सांगायला हवे.
७. मुलांसाठी पूर्णपणे हानीकारक असलेल्या गोष्टींना बिनदिक्कत ‘नाही’ म्हणायला हरकत नाही, ती रडली तरी ! जसे की ‘प्रोसेस्ड’ (प्रक्रिया केलेले) चीज क्यूब, कलर घातलेले जॅम, जेली आणि केक, चायनीज पदार्थ अन् विशेषकरून पूर्णपणे पाम ऑईलमध्ये तळलेले चिप्स वगैरे. ‘शेंगदाणा तेल’ लिहितांना त्यातही परत भेसळ असूही शकते; पण उघड्या डोळ्यांनी ‘पाम ऑईल’ असे लिहिलेले पदार्थ तरी टाळावेत.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा क्लिनिक, पुणे.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !