
‘देवतांनी प.पू. दादाजींना (प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना) आधीच सांगून ठेवले होते की, ‘आपल्याला आपल्या इच्छेनुसार मरण येईल. तेव्हा आम्ही आपल्याला वैकुंठलोकात नेण्यास येऊ.’

मी परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) विचारले, ‘‘याला स्वेच्छामरण म्हणायचे का ?’’ त्या वेळी परम पूज्य म्हणाले, ‘‘प.पू. दादाजी हे उच्च कोटीचे संत होते. उच्च कोटीच्या संतांना स्वत:ची अशी काही इच्छा नसते. त्यांचा मृत्यूही ईश्वरेच्छेनेच होतो. त्यांना त्यांच्या सर्वज्ञतेमुळे ईश्वराने त्यांच्या मृत्यूची नेमून दिलेली वेळ कळलेली असल्याने ते स्वत:च्या मृत्यूविषयी आधीच भाष्य करून ठेवतात. त्या वेळी आपल्याला वाटते की, अरे, हे स्वेच्छामरण आहे; परंतु तसे ते नसते.
‘उच्च कोटीच्या संतांनी सांगून देहत्याग करणे’, ही त्यांची स्वेच्छा नसून ईश्वरेच्छाच असते. उच्च कोटीच्या संतांच्या बाबतीत ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद’ या तत्त्वाच्या आधारावर त्यांचे कार्य चालू असल्याने त्यांची स्वेच्छाही ईश्वरेच्छाच असते.’’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’