अमेरिकेतील हिंदु बलोच नेते डॉ. तारा चंद यांची डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेत वास्तव्यास असलेले बलुचिस्तानचे नेते डॉ. तारा चंद यांनी डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे बलूच जनतेच्या समर्थनाची मागणी केली आहे. त्यांनी व्हेनेझुएलामध्ये झालेल्या कारवाईचे समर्थन करतांना म्हटले की, ट्रम्प यांनी मादुरो यांना अटक करून तेथील जनतेला सत्ताधारी दडपशाहीतून मुक्त केले. अशीच भूमिका त्यांनी बलुचिस्तानातील जनतेसाठीही घ्यावी. विशेषतः पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसीम मुनीर त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली. पाकमधील बलुचिस्तान प्रांत अनेक वर्षांपासून अस्थिरता आणि राजकीय संघर्ष यांचा सामना करत आहे. येथे मोठा वर्ग सरकार आणि सैन्य यांच्या कारभारावर अप्रसन्न असून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहे.
President Donald Trump, @POTUS , recently stood with the people of Venezuela against dictatorship. He should likewise support the people of Balochistan in their struggle for freedom. Just as the Venezuelan dictator Nicolás Maduro handed over his nation’s natural resources to… pic.twitter.com/wqzWmu3jTl
— Dr. Tara Chand (@drtchand) January 4, 2026
बलुचिस्तानच्या विधानसभेचे माजी सदस्य आणि राज्य सरकारमध्ये माजी मंत्री, तसेच ‘बलूच अमेरिकन काँग्रेस’चे अध्यक्ष डॉ. तारा चंद यांनी याविषयी सामाजिक माध्यमावर विस्तृत लेखन केले आहे. यात त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना उद्देशून म्हटले आहे की, आपण व्हेनेझुएलातील जनतेला स्वातंत्र्याच्या लढ्यात साथ दिली. त्याचप्रमाणे बलुचिस्तानातील जनतेलाही त्यांच्या अधिकारांसाठी समर्थन द्यावे.
मुनीर आणि मादुरो यांच्यातील समानता
डॉ. तारा चंद यांनी म्हटले आहे की, व्हेनेझुएलाचे शासक निकोलस मादुरो यांनी देशातील नैसर्गिक संसाधने चीनकडे वळवण्याची मुभा दिली. त्याच धर्तीवर पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसीम मुनीर हेही बलुचिस्तानमधील नैसर्गिक आणि सागरी संसाधन यांची विक्री करून प्रचंड नफा मिळवत आहेत. त्यामुळे दोघांच्या कार्यपद्धतीत साम्य आहे.
दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप
डॉ. तारा चंद यांनी असेही म्हटले आहे की, मुनीर यांची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे ते चीनला संसाधनांची उपलब्धता करून देतात, तर दुसरीकडे त्या संसाधनांचा वापर अमेरिकेला भ्रमित करण्यासाठी केला जातो. त्यामुळे ट्रम्प यांनी मादुरोप्रमाणेच मुनीर यांच्या विरोधातही कठोर पावले उचलावीत.
पाकिस्तानी सैन्य धोकादायक
डॉ. तारा चंद यांचे म्हणणे आहे की, मादुरो यांची सत्ता अमली पदार्थ व्यापार, शस्त्रांची तस्करी, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अस्थिरता पसरवण्यात गुंतलेली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तानी सैन्यही आतंकवादी प्रवृत्तीला चालना देत असून जागतिक स्थैर्यासाठी गंभीर धोका बनले आहे. आसीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील सेना प्रतिदिन बलूच जनतेवर अत्याचार करत असून त्यांना मानवतेविरुद्धच्या अपराधांसाठी उत्तरदायी धरले जावे.
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र