Nepal Mosque Vandalized : नेपाळमध्ये मुसलमानांनी हिंदुविरोधी व्हिडिओ प्रसारित केल्याने मशिदीची तोडफोड

मुसलमानांनी नंतर केलेल्या हिंसाचारात ७ पोलीस घायाळ

काठमांडू (नेपाळ) : भारताच्या सीमेवरील नेपाळच्या धनुषा जिल्ह्यामध्ये मुसलमानांकडून सामाजिक माध्यमांतून हिंदुविरोधी व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर मशिदीची तोडफोड करण्यात आली. ही घटना ३ जानेवारीला घडली. यानंतर मुसलमानांनीही हिंसाचार केला. यात ७ पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी भोला दाहाल यांनी लोकांना सामाजिक ऐक्य बिघडवणार्‍या कोणत्याही कृतीत सहभागी न होण्याचे आवाहन केले.

पोलिसांनी सांगितले की, ‘टिकटॉक’ ॲपवर व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आणि तोडफोडीत सहभागी झाल्याच्या आरोपावरून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. २ मुसलमान तरुणांनी सामाजिक माध्यमांवर हिंदूविरोधी मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या विरोधात व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर उद्रेक झाल्यावर पुन्हा हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !