हिवाळ्यात तजेलदार त्वचेसाठी आवळा खाण्याचे महत्त्व !

सौंदर्य प्रसाधनांपेक्षा नैसर्गिक आहाराचा तुमच्या त्वचेवर अधिक प्रभाव पाडतो.

काय आहे खास ?

१. ऋतूंनुसार आहार : निसर्गाने प्रत्येक ऋतूत विशिष्ट फळे दिली आहेत, ती भरभरून खा.

२. आवळ्याचे महत्त्व : ‘An Amla a day keeps the doctor away !’ (प्रतिदिन एक आवळा खाल्ल्याने डॉक्टरांपासून दूर रहाण्यास साहाय्य होते.) यासह त्वचा सतेज रहाते.

३. कसे खावे ? : तुमच्या प्रकृतीनुसार (उदा. पित्त प्रकृती असल्यास मोरवळा) आणि वैद्यांच्या सल्ल्यानुसार आवळ्याचे सेवन करा.

हिवाळ्यातील फळे फक्त चविष्ट नसून ती तुमच्या त्वचेसाठी वरदान आहेत. आवळा, बोर आणि पेरू यांसारखी फळे तुमच्या प्रतिदिनच्या आहारामध्ये यांचा समावेश करा आणि त्वचेला तजेलदार बनवा.

– वैद्य हरिश पाटणकर, पुणे