
मुंबई – वस्तू सेवा करासह भोजनाच्या रकमेवर आणखी १० टक्के सेवाशुल्क आकारल्याप्रकरणी ‘केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा’ने ‘चायना गेट रेस्टॉरंट प्रा. लिमिटेड’ या आस्थापनाला ५० सहस्र रुपये दंड आकारला आहे. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून हा दंड आकारण्यात आला आहे.
‘चायना गेट रेस्टॉरंट प्रा. लिमिटेड’ या आस्थापनाकडून मुंबईत विविध ठिकाणी ‘बोरा बोरा’ या नावाने रेस्टॉरंट चालवण्यात येत आहेत. एप्रिल २०२६ मध्ये ही घटना घडली. त्या वेळी रेस्टॉरंटच्या मालकाला सेवाशुल्क न घेण्याविषयी विनंती करूनही ग्राहकाकडून मूळ देयकाच्या अतिरिक्त १० टक्के सेवाशुल्क घेण्यात आले. २८ मार्च २०२५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत या आस्थापनाच्या मुंबईतील तीनही रेस्टॉरंटमध्ये अनेक ग्राहकांकडून अशा प्रकारे नियमबाह्य सेवाशुल्क वसूल करण्यात आले. या प्रकरणी निर्णय देतांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या प्रकरणी देहली उच्च न्यायालयातील एका निर्णयाचा संदर्भ दिला. या निर्णयानुसार कोणत्याही अनिवार्य सेवांसाठी शुल्काची आकारणी करणे कायद्याशी विसंगत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित