|

चंद्रपूर – सावकारी जाचाला कंटाळून रोशन कुडे या शेतकर्याने किडनी विकल्याच्या प्रकरणी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे जाळे समोर आले आहे. रोशन कुडे यांचा कंबोडियाला जातांनाचा विमानतळावरील व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामुळे पोलिसांना आंतरराष्ट्रीय टोळीविषयी शंका आली. चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणात कंबोडियातील मिलिटरी हॉस्पिटलसह तमिळनाडू आणि देहली येथील नामांकित डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले रामकृष्ण सुंचू आणि हिमांशू भारद्वाज यांनी त्यांची किडनी आर्थिक अडचणीमुळे विकली होती. त्यानंतर अधिक पैशांच्या मोहापायी ते स्वतःच दलाल बनले असल्याचे विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्.आय.टी.च्या) अन्वेषणात समोर आले.
रोशन कुडे आणि रामकृष्ण सुंचू यांची किडनी कंबोडियातील मिलिटरी रुग्णालयामध्ये काढण्यात आली, तर हिमांशूची किडनी तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स रुग्णालयामध्ये काढण्यात आली होती. या रुग्णालयाचे संचालक डॉ. गोविंदस्वामी राजरत्नम् यांना कह्यात घेण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचे पथक तामिळनाडूमध्ये गेले आहे. देहलीतील डॉ. रविंद्रपाल सिंग यांना या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने चंद्रपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.
आतापर्यंत देशांतर्गत १० ते १५ अवैध किडनी प्रत्यारोपण झाल्याचा संशय आहे. या जाळ्यामध्ये देशातील अनेक नामांकित रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह ४८ लाख रुपये फेडल्यानंतरही सावकारांचा त्रास अल्प झाला नाही. या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांना सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. कुडे यांनी ऑनलाइन किडनी विक्री करणार्या टोळीशी संपर्क साधला. त्यांना स्वतःच्या किडनीच्या मोबदल्यात केवळ ८ लाख रुपये मिळाले; मात्र तरीही सावकारांचा जाच चालूच राहिल्याने त्यांनी अखेर पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
New FCRA Rules : ‘धार्मिक कृती’च्या नावाखाली धर्मांतर करणार्यांच्या परदेशी देणग्यांवर केंद्र सरकारचा प्रहार
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !