योग्य आहार कोणता ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘योग्य आहार, म्हणजे साधा आहार; अत्यंत मसालेदार नव्हे. फार तेलकट-तुपकट पदार्थ खाणे चांगले नाही. तळलेल्या पुर्‍यांपेक्षा पोळ्या बर्‍या. पुर्‍या म्हणजे रोग्यांचे अन्न.

भूक लागल्यास केवळ कचोरी आणि जिलेबी खाण्याऐवजी एक पैशाचे चुरमुरे घेऊन खा. स्वस्तही पडेल आणि खाणेही होईल. वरण, भात, कणकेच्या पोळ्या, भाज्या आणि दूध अगदी पुरेसे खाद्य होते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)