
रामेश्वरम् (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने नुकतेच ३ भारतीय मासेमारांना कह्यात घेतले आणि त्यांची नौकाही जप्त केली. या कारवाईमुळे तमिळनाडूतील रामेश्वरम् येथील मासेमार संतप्त झाले आहेत. रामेश्वरम् मत्स्य विभागानुसार अटक झालेल्यांची नावे रूबन, नागराजन आणि प्रभु अशी आहेत.
नेदुनथीवूच्या जवळ मासेमारी करत असतांना श्रीलंका नौदलाच्या गस्ती पथकाने त्यांना थांबवून कह्यात घेतले. त्यांची नौका जप्त करून उत्तरेकडील कराईनगर नौदल तळावर नेण्यात आली. भारतीय मासेमार प्रतिनिधींच्या माहितीनुसार गेल्या १५ दिवसांतील ३ घटनांमध्ये श्रीलंका नौदलाने १३ मासेमारांना अटक केली असून ३ नौका जप्त केल्या आहेत. रामेश्वरम् येथील मासेमार संघटनेचे नेते व्ही.पी. जेसु राजा यांनी सांगितले की, वारंवार होणार्या अटकसत्रांमुळे मासेमार त्रस्त झाले आहेत. भारत आणि श्रीलंका सरकारांनी उच्चस्तरीय चर्चेतून यावर स्थायी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाएकतर आंतरराष्ट्रीय समुद्री सीमांविषयी भारतीय मासेमारांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीलेंकेच्या समुद्री भागांत प्रवेश करत आहेत किंवा श्रीलंका मुद्दामहून अशा कुरापती काढत आहे. यावर भारत सरकार काय तोडगा काढणार ? |
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !