
सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरनिमित्त पर्यटनस्थळांवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सातारा पोलीस दलाच्या वतीने १ सहस्र २०० पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी ११२ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. २२ पोलीस पथकांकडून हॉटेल आणि लॉज यांची पडताळणी करण्यात येणार आहे. ‘ब्रेथ एनलाईझर’साठी (श्वास विश्लेषकासाठी) ३९ पथके सिद्ध ठेवली आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात नाच-गाणे करणार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथके सिद्ध केली असून त्यांना ‘डेसिबल मीटर’ दिले आहेत.
जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर वही विकास बामनोली तापोळा मेढा कोयनानगर या पर्यटन स्थळावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात ५ उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ७० साहाय्यक पोलीस निरीक्षक, १ सहस्र २०० पोलीस जवान, ७०० गृहरक्षक नेमण्यात आले आहेत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेची ७ विशेष पथके कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्तासाठी सिद्ध ठेवण्यात आली आहेत. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ७ निर्भया पथके ५० पोलीस कर्मचार्यांसह सज्ज आहेत.
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज