रसायनमुक्त उदबत्तीमुळे पर्यावरण संरक्षणाला चालना !

तुळजापूर – ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार्या फुलांपासून सेंद्रिय उदबत्ती सिद्ध करण्याचा पर्यावरणपूरक आणि पवित्र उपक्रम चालू करण्यात आला आहे. वाढत्या भाविक संख्येमुळे साचणार्या निर्माल्याचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत अर्पण केलेली फुले गोळा करून ती सेंद्रिय पद्धतीने वाळवली जातात. त्यांची पावडर करून नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने पूर्णतः रसायनमुक्त उदबत्ती सिद्ध केली जाते. यामुळे निर्माल्याचे पावित्र्य जपले जात असून पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळत आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सेंद्रिय उदबत्ती भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रावरून उदबत्तीसमवेत धूप, उद आणि हवन कपसुद्धा खरेदी करता येणार आहेत.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान